BREAKING NEWS
latest

इडली चटणी सांबार विक्रीच्या व्यवसायातून तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध..

प्रतिनिधी: अवधूत सावंत

इडली चटणी सांबार सारखे पौष्टिक अन्नपदार्थ स्वस्त दरात विकून आर्थिक उत्पत्ती होऊ शकते आणि रोजगार उपलब्ध होऊ शकतो हे डोंबिवलीतील एका तरुणाने दाखवून दिले आहे. महाराष्ट्रातील जनतेला सकस -  दर्जेदार अन्न स्वस्त दरात मिळावे आणि तरुणांना रोजगार मिळावा याकरीता 'नादब्रह्म इडली विक्री  सेवा' व्यवसाय सुरू करण्यात आला आहे. नादब्रह्म हे नाव आता डोंबिवली येथे दर्जेदार आरोग्यदायी इडली चटणी सांबार साठी ओळखले जाणार आहे. डोंबिवली येथे पहिल्यांदा अवघ्या दहा रुपयांत हि सेवा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. 

पुणे, नवी मुंबई, ठाणे आणि महाराष्ट्रातील खवय्यांची मनं आणि ह्रदय जिंकल्यावर  डोंबिवली पूर्व, रामनगर मधील स्वामी समर्थ मठासमोर नादब्रह्म इडली आउटलेट योगेश कोठावदे यांनी सुरु केले आहे. या आऊटलेटचे उद्घाटन कल्याण डोंबिवली महापालिकेचे स्थायी समितीचे सभापती आणि महाराष्ट्र युवा सेनेचे प्रदेश सचिव दीपेश म्हात्रे यांनी केले आहे. या वेळी रामनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन गिते, रिक्षा चालक-मालक संघटनेचे उपाध्यक्ष अर्जुन माने, सुप्रसिद्ध गायक शेखर गायकवाड, आरती कोठावदे आणि मान्यवर मंडळी उपस्थित होते.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत