प्रतिनिधी: अवधूत सावंत
दिनांक: १२/०८/२०२३ रोजी सकाळी ११:३० ते १.१५ वाजण्याच्या सुमारास फिर्यादी व त्यांचे पती चार रस्ता येथे खरेदी करण्याकरीता गेले असता, सन २०२२ ते फेब्रुवारी २०२३ पर्यंत फिर्यादी यांचे घरी यापूर्वी घरकाम करणारी महीला इसम नामे सिमा गावडे उर्फ नेहा ढोलम ही घराची डुप्लिकेट चावी तयार करून फिर्यादी यांचे राहत्या घरात प्रवेश करुन २,९०,०००/- रुपये रोख रक्कम व दागीने असा ऐवज चोरी करून नेल्याच्या तक्रारीवरुन डोंबिवली पोलीस ठाणे येथे गु.र.क्र. - २८४/२०२३ कलम ३८१,४५४, भादंवि प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याच्या तपासाच्या अनुशंगाने नमुद गुन्ह्याच्या घटनास्थळाचे सीसीटीव्ही फुटेजची पाहणी तसेच वॉचमनची चौकशीचे आधारे नमुद गुन्हयातील पाहीजे आरोपी सीमा उर्फ नेहा सदानंद ढोलम (वय ४१ वर्षे) धंदा: घरकाम राहणार: रुम नं १२ न्यु सुरज सोसायटी, बी-विंग, मद्रासी मंदीराजवळ, राजाजी पथ, डोंबिवली (पूर्व) हीला ताब्यात घेवुन सादर गुन्ह्याच्या अनुशंगाने चौकशी केली असता तीने गुन्ह्याची कबुली दिल्याने तिला अटक करून गुन्हयात चोरी केलेला मुददेमाल १५,०००/- रुपये रोख रक्कम, १,४०,५००/- रुपये किंमतीचा एक सोन्याचा २१.८८० ग्रॅम वजनाचा हार, ११.५००/- रुपये किंमतीची एक रोझ गोल्डची १.८६० ग्रॅम वजनाची अंगठी, ८८,०००/- रुपये किंमतीची एक १४,९९० ग्रॅम वजनाची सोन्याची लगड व दोन बनावट चाव्या असा एकूण २,५५,०००/- रुपये किंमतीचा मुददेमाल पोलिसांनी हस्तगत केला.
सदरची कामगिरी मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ -३ कल्याणचे श्री. सचिन गुंजाळ, मा.सहाय्यक पोलीस आयुक्त, डोंबिवली विभाग श्री. सुनिल कुराडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. नितीन गिते यांच्या मार्गदर्शनाखाली डोबिवली पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सपोनि योगेश सानप, पोहवा. विशाल वाघ, कुरणे, प्रशांत सरनाईक, पोअं. पोटे, सांगळे, मपोहवा. जाधव, मपोशि. राजपुत पोना. दिलीप कोती यांनी कामगिरी केली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा