BREAKING NEWS
latest

टोमॅटोची लाली उतरल्याने लासलगाव मार्केटला टोमेटोचा लाल चिखल..

प्रतिनिधी: अवधूत सावंत

  गेल्या काही दिवसांपुर्वी टोमॅटो भलताच भाव खात होता, यामुळे कधी नव्हते शेतकऱ्यांना चार पैसे मिळत होते. मात्र अचानक टोमॅटोच्या दरात घसरण होण्यास सुरवात झाली आहे. लासलगाव बाजार समितीमध्ये जवळपास नव्वद टक्के दराची घसरण झाल्याचे निदर्शनास आले आहे. काही दिवसांपूर्वी हेच २० किलोचे कॅरेट्स २२०० रुपयांहून अधिक दरात जात असताना आता थेट पन्नास ते शंभर रुपयांवर भाव आलेला आहे.

गुजरात मध्ये गोकुळाष्टमीचा सण  दहा दीवस साजरा केला जातो त्यामुळे तिथे टोमॅटोची मागणी नाही. दिल्ली येथे सुरु असलेल्या जी-२० परिषद बैठकांमुळे तेथे बाहेरील वाहनास पाच ते सहा दिवस प्रवेश बंद असल्याने दिल्लीला माल जाऊ शकत नाही. बंगळुरूच्या बाजारपेठेत वाढलेल्या आवकेमुळे टोमॅटोच्या दरात घसरगुंडी झाली व होत आहे. दोन हजार रुपयांचा दर गेल्या पंधरा दिवसात कमी होत ५० ते १०० रुपये प्रति क्रेट्सपर्यंत कोसळल्याने टोमॅटोच्या बाजारभावाची लाली उतरली आहे.

संतप्त झालेल्या टोमॅटो उत्पादक शेतकऱ्याने लासलगाव बाजार समितीमध्ये टोमॅटो फेकून देत आपला संताप व्यक्त केला. टोमॅटोच्या २० किलोच्या क्रेट्सला पन्नास ते शंभर रुपयापर्यंत दर मिळत असल्याने टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांमध्ये प्रंचड रोष निर्माण झाला आहे. गेल्या दोन महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने टँकरच्या साह्याने टोमॅटोला पाणी दिले. आजच्या दरामध्ये उत्पादन खर्च तर दूरच वाहतूक आणि मजुरी खर्चही निघणे मुश्किल झाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी टोमॅटो रस्त्यावर ओतुन देत संताप व्यक्त केला. रस्त्यावर टोमॅटोचा चिखल झाल्याचे पाहवायास मिळाले आहे. गांजाच्या शेतीला परवानगी द्या अशी मागणी संतप्त टोमॅटो उत्पादक शेतकरी करीत आहेत.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत