BREAKING NEWS
latest

डोंबिवलीत सकल मराठा समाजाच्या वतीने लाठी हल्ल्याच्या विरोधात निषेध मोर्चा..

प्रतिनिधी: अवधूत सावंत

  राज्य सरकारकडे "दोन दिवसांत आरक्षण द्या" अशी मागणी 'डोंबिवली सकल मराठा समाज' समन्वयकांच्या वतीने करण्यात आली. मंगळवारी जालना येथे मराठा समाजातील आंदोलकांवर झालेल्या अमानुष लाठीचाराच्या निषेधार्थ सकल मराठा समाजाच्या वतीने निषेध मोर्चा इंदिरा चौक येथे काढण्यात आला होता. 

मराठा आरक्षणासाठी आंतरवाली सराटी येथे उपोषणास बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांची तब्येत ढासळली असून ते मरणासन्न अवस्थेत आहेत. त्यामुळे सरकारने दोन दिवसात आरक्षण द्यावे. केंद्रात आणि राज्यात एकाच पक्षाचे सरकार असून त्यांनी मराठा समाजाला न्याय द्यावा. मराठा आरक्षणासाठी ४२ जणांना आपल्या प्राणांची आहुती द्यावी लागली असून आत्ता ४३वी आहुती देण्याची वेळ येऊ नये तसेच जरांगे यांचे प्राण वाचवावे. त्यासाठी दोन दिवसात अध्यादेश काढून आरक्षण देण्यात यावे. राज्यातील बदलत्या सरकारमुळे मराठा आरक्षणाचा लपंडाव सुरु आहे. त्यामुळे दोन दिवसात आरक्षणाचा निर्णय घ्यावा. असे आवाहन डोंबिवलीतील सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले .
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत