BREAKING NEWS
latest

गणेशोत्सवानिमित्त 'फाउंडेशन फॉर चाईल्ड प्रोटेक्शन - मुस्कान' संस्थे मार्फत 'बाल लैंगिक अत्याचार व पॉक्सो' कायद्याबाबत जनजागृती कार्यक्रम संपन्न..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

बाल लैंगिक अत्याचार दिवसेंदिवस अत्यंत गंभीर समस्या बनत चालली आहे. समाजामध्ये या समस्या विषयी उघडपणे बोलले देखील जात नाही. काही वेळा अश्या समस्या घडल्यानंतर काय करायचे हे समजत देखील नाही. या समस्या विषयी 'फाऊंडेशन फॉर चाईल्ड प्रोटेक्शन - मुस्कान' ही संस्था २००० सालांपासून काम करते. मुस्कान संस्था वस्ती पातळीवर मुलांसोबत, पालकांसोबत, शाळांमध्ये शिक्षक व विविध सामाजिक संस्था सोबत या विषयाशी जनजागृती करत आहे. पीडित बालकांचे व पालकांचे समुपदेशन, पोलीस - कायदेशीर मदत, पुनर्वसन आणि उपचार सेवा देण्याचे काम सुद्धा अविरतपणे करत आहे.
 
 ह्या गणेश उत्सवात 'एफएफसीपी - मुस्कान' द्वारे पुण्यामध्ये कलाकार कट्टा, वडारवस्ती विश्रांतवाडी, रेंज हिल खडकी, पत्र्याची चाळ, व पिंपरी चिंचवड मध्ये काळेवाडी, निगडी, थेरगाव, चिंचवड या ठिकाणी तेथील स्थानिक तरुण मंडळ यांच्यासोबत बाल लैंगिक अत्याचार या विषयाशी निगडीत ''आरसा समाजमनाचा'' या पथ नाटीकाच्या माध्यमातून बाल लैंगिक अत्याचार म्हणजे काय, मुलांना खाजगी अवयव, सुरक्षित स्पर्श व असुरक्षित स्पर्श याची माहिती देण्यात आली. 

अश्या प्रसंगामध्ये आपण आपला बचाव करण्याबाबत अश्या प्रसंगामध्ये त्या व्यक्तीला नाही म्हणा, पळून जा, व विश्वासातील व्यक्तीला सांगा तसेच असे अत्याचार हे मुलांवर सुद्धा होतात व अत्याचार करणारी व्यक्ती कोणीही असु शकते हे सांगितले गेले. या शिवाय अलीकडे अठरा वर्ष्याच्या आत मधील मुले सहमतीने शारीरिक संबंध ठेवतात ते सुद्धा पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा आहे हे सांगितले. या पथ नाट्याच्या माध्यमातून आव्हान केले गेले की अश्या घटना आपल्या जवळपास घडत असेल तर आपण एक सृजान नागरिक या नात्याने पोलीसांना किंवा 'एफएफसीपी - मुस्कान' संस्थेच्या हेल्पलाईन ९६८९०६२२०२ / ९११२२९९७८४ / ८५  या क्रमांक वरती फोन करून माहिती द्यावी.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत