अंमली पदार्थ असलेल्या औषध म्हणून वापरात येणारे कफ सिरप बाटल्यांचा नशेसाठी तस्करी करणाऱ्या तिघांना बाजारपेठ पोलीसांनी जेरबंद केले आहे. बाजारपेठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांनी आपल्या डिटेक्शन स्टाफ ला दिशा निर्देश देऊन अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांवर अंकुश ठेवण्यासाठी कडक कारवाईचे आदेश दिले होते.
अशातच दिनांक १२/१०/२०२३ रोजी बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गोविंदवाडी बायपास रोडवरील 'सर्वोदय बिल्डिंग'च्या समोर नाल्या जवळ, नशेसाठी वापरण्यात येणारे कफ सिरप या अंमली पदार्थाची तस्करी करण्यासाठी काही इसम येणार असल्याची बातमी डिटेक्शन स्टाफ मधील पोलीस हवालदार सचिन साळवी यांना गुप्तरीत्या मिळाली. सदरची माहिती त्यांनी ताबडतोब आपल्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांना कळवून त्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वोदय बिल्डिंगचे जवळ गोविंदवाडी रोड कल्याण येथे डिटेक्शन इन्चार्ज सपोनि नवनाथ रूपवते यांनी आपल्या डीबी पथकातील पोलीस हवालदार सचिन साळवी, पावशे, प्रेम बागुल, बाविस्कर, भालेराव, पोना. कातकडे, फड, आंधळे यांच्यासह सापळा रचला. गुप्त बातमीदाराने दिलेल्या माहितीनुसार तीन इसम त्यांच्याकडील ऑटो रिक्षाने येत असताना दिसताच, त्यांना पळून जाण्यास वाव न देता डिटेक्शन पथकाने मोठ्या शिताफीने त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्या गाडीची व त्यांची झडती घेतली असता त्यांच्या ताब्यात एकूण 'फेडेरेक्स' (FEDEREX) नावाचे कफ सिरप अंमली पदार्थच्या एकूण ६० बाटल्या अंगझडतीत मिळून आल्या असून त्या तसकऱ्यांची नावे -
१. अरबाज आमिर खान,
२. अब्दुल कादिर मुस्ताक अहमद अन्सारी,
३. गुलफाम अहमद वकील अहमद सय्यद, सर्व राहणार - कसाई वाडा, कुरेशी नगर कुर्ला (पूर्व) मुंबई अशी असून त्यांच्याकडून एकूण नशेसाठी वापरण्यात येणारे फेडेरेक्स (FEDEREX) कफ सिरप, नावाच्या ६० बाटल्या असा अंमली पदार्थ तसेच एक ऑटो रिक्षा असा एकूण १,१०,५००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून सदर फेडेरेक्स (FEDEREX) कफ सिरप असा अंमली पदार्थ कोठून आणला व ते कोणाला देणार होते याचा बाजारपेठ पोलीस तपास करीत आहे.
सदरची कारवाई मा. सचिन गुंजाळ पोलीस उप-आयुक्त परिमंडळ-३, कल्याण आणि मा. कल्याणजी घेटे सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याण विभाग, कल्याण यांचे मार्गर्शनाखाली तसेच सदरची कामगिरी वरीष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार, सपोनिरी. नवनाथ रूपवते आणि डीबी टीम यांनी केली आहे असे प्रसिद्धी माध्यमांना सांगण्यात आले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा