पुणे : पुण्यातील पिंपरी-चिंचवड येथील उपनिरीक्षक सोमनाथ झेंडे हे ऑनलाईन 'ड्रीम ११' जुगार खेळून रातोरात करोडपती झाले. मात्र, आता त्यांना 'ड्रीम ११' चा ऑनलाईन जुगार खेळणे अंगलट आले आहे. झेंडे यांची पोलीस खात्याअंतर्गत चौकशी होऊन त्यांच्यावर कारवाई करण्याचे संकेत पोलीस आयुक्त सतीश माने यांनी दिले होते. त्याची चौकशी पूर्ण झाली असून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. सोमनाथ झेंडे यांनी ऑनलाईन जुगाराला प्राधान्य दिले. तसेच कामावर असताना त्यांनी जुगाराचा गेम खेळून पैसे जिंकले आहेत. शिवाय यानंतर त्यांनी याचा गाजावाजा करत सरकारी पोलीस वर्दीत माध्यमांना मुलाखती दिल्या. हीच चूक त्यांना भोवली असून अंगलट आली आहे.
देशात सध्या 'क्रिकेट वर्ल्ड कप'चा फिवर सुरू असतांना पुण्यातील पिंपरी-चिंचवड येथील पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ झेंडे हे 'ड्रीम ११' या ऑनलाईन जुगार खेळामुळे रातोरात करोडपती झाले. त्यांना यात चक्क दीड कोटी रुपयांची लॉटरी लागली आहे. त्यांचे कुटुंबीय आनंदात असतांना निलंबनाच्या कारवाईमुळे त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांचा आनंद मावळला आहे.
सोमनाथ झेंडे यांनी कामावर असताना त्यांनी ऑनलाईन बॅटिंग गेम असलेल्या 'ड्रीम ११' हा जुगाराचा गेम खेळला. त्यांनी टीम तयार करत दीड कोटी रुपये जिंकले होते. दरम्यान, त्यांनी ऑनलाईन गेमचे उदात्तीकरण केले. तसेच सरकारी पोलीस वर्दीवर मुलाखती देखील दिल्या होत्या. यामुळे त्यांची खात्याअंतर्गत चौकशी करण्याचे आदेश पोलीस आयुक्त नितीन माने यांनी दिले होते. त्याची चौकशी पूर्ण झाली असून त्यांनी सरकारी वर्दीच्या वर्तवणुकीला बाधा पोहचवल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. यामुळे त्यांचे निलंबन करण्यात आले आहे. झेंडे यांना त्यांची बाजू मांडण्याची देखील संधी देण्यात येणार आहे.
पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ झेंडे यांचे नशीब या खेळामुळे पालटले होते. त्यांनी 'ड्रीम ११' वर आपला संघ बनवत केवळ ४९ रुपयांच्या मोबदल्यात दीड कोटी रुपयांचे बक्षीस जिंकले होते. त्यांनी बांगलादेश विरुद्ध इंग्लंड या क्रिकेट सामन्यावर ड्रीम इलेव्हन वर टीम तयार केली होती. यातूनच त्यांना ही दीड कोटीची लॉटरी लागली. या घटनेमुळे सोमनाथ झेंडे हे रातोरात प्रसिद्ध देखील झाले. मात्र, आता त्यांना ऑनलाईन जुगार खेळणे अंगलट आले आहे. त्यांचे निलंबन करण्यात आले असून खात्याअंतर्गत विभागीय चौकशीत त्यांना त्यांची बाजू मांडण्याची संदही दिली जाणार आहे. तरुण अशा ऑनलाईन गेमला आहारी जाऊ नयेत, आणि त्यात त्यांची फसवणूक होऊ नये, म्हणून पोलीसांनी जनजागृती करणं गरजेचे असतांना झेंडे यांनी मुलाखती देऊन या गेमचे उदात्तीकरण केले. पोलीस असून सुद्धा त्यांनी समाजात चुकीचा संदेश पसरवल्यामुळे त्यांच्यावर ही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा