BREAKING NEWS
latest

सिव्हिल हॉस्पिटल आणि 'कामा' संघटनेच्या संयुक्त माध्यमातून आदीवासी, प्रसूतीकालीन आणि अपघातग्रस्त रुग्णांसाठी भव्यरित्या रक्तदान शिबिराचे आयोजन..


प्रतिनिधी: अवधुत सावंत


डोंबिवली: सिव्हिल हॉस्पिटल आणि डोंबिवली एमआयडीसीतील 'कल्याण अंबरनाथ मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन' (कामा) संघटनेच्या संयुक्त माध्यमातून भव्यरित्या रक्तदान शिबिराचे डोंबिवली येथील उद्योजकांच्या कामा संघटनेच्या कार्यालयात मंगळवारी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ठाणे सिव्हिल हॉस्पिटल येथे संपूर्ण ठाणे जिल्हा तसेच पालघर व रायगड येथून गरजू आदिवासी रुग्ण उपचाराकरिता येत असतात. तसेच गरोदर स्त्रियांची प्रसूती व सिझेरियन विभाग येथे मोठ्या प्रमाणावर प्रसूती साठी गरोदर माता सिव्हिल हॉस्पिटल, ठाणे येथे मोठ्या प्रमाणावर दाखल होत असतात. त्याचबरोबर हॉस्पिटलमध्ये अपघातग्रस्त रुग्ण मोठ्या प्रमाणात भरती करण्यात येतात.
सद्यस्थितीत सिव्हिल हॉस्पिटल ठाणे येथे रक्ताची टंचाई जाणवत असून संपूर्ण मुंबई व ठाणे शहरात रक्ताचा तुटवडा भासत असल्यामुळे ठाणे सिव्हिल हॉस्पिटलच्या वतीने विविध ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येत असल्याची माहिती सिविल हॉस्पिटलच्या वतीने देण्यात आली आहे. त्यामुळे जनहितार्थ ठाणे सिव्हिल रुग्णालयातर्फे आवाहन करण्यात आले की युद्ध पातळीवर तातडीने रक्तदान शिबीराचे आयोजन करून स्वेच्छेने लोकांनी रक्तदान करण्यास पुढाकार घेऊन रक्तदान करावे जेणेकरून सर्व गरजू रुग्णांना रक्तपुरवठा करणे शक्य होईल तसेच ही रक्तदान मोहीम गुरुवार, दि. १६ नोव्हेंबर २०२३ रोजी पासून रक्तपेढी विभाग (ब्लड बँक), सिव्हिल रूग्णालय ठाणे, प्रादेशिक मनोरुग्णालयाजवळ, ठाणे या ठिकाणी दररोज सुरू राहणार असून इच्छुक रक्तदात्यांनी रक्तदान करून या थोर सामाजिक व राष्ट्रीय कार्यात सहभागी व्हावे, अशी आग्रहाची विनंती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.कैलास पवार, जिल्हा सामान्य रुग्णालय, ठाणे यांनी आपल्या विनंतीपत्रकातून रक्ताचा तुटवडा होत असल्यामुळे ठाणे सिव्हिल हॉस्पिटलच्या वतीने विविध ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येत असल्याची माहिती सिविल हॉस्पिटलच्या वतीने देण्यात आली होती म्हणून औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचनालायाचे सहसंचालक सुरेश जोशी यांच्या निर्देशानुसार आणि सिव्हिल हॉस्पिटलच्या संयुक्त माध्यमातून डोंबिवली येथील उद्योजकांच्या 'कल्याण अंबरनाथ मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन' (कामा) संघटनेच्या कार्यालयात मंगळवारी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.


शिबिराला सकाळी ११ वाजता सुरुवात होताच 'कामा' संघटनेच्या कर्मचारी वर्गाने या रक्तदान शिबिराला प्रचंड प्रतिसाद देत रक्तदान करण्यास रांगा लावल्या. ठाणे सिव्हिल हॉस्पिटल चे डॉ.गिरीश चौधरी हेही या शिबिराला प्रत्यक्ष उपस्थित राहून रक्तदान करण्यास येणाऱ्या प्रत्येक स्वेच्छा रक्तदात्याला तपासून रक्तदान करण्यास पात्र ठरवून मगच रक्तदान करायला पाठवत होते. डाॅ.चौधरी म्हणाले कि, डेंग्यू आणि मलेरिया सारख्या साथ रोगामुळे रक्त आणि प्लेटलेट्स ची गरज आहे. त्याचबरोबर सणांच्या निमित्ताने सुट्टी लागली असल्याने रक्तदान करणारी महाविद्यालयीन तरुण पिढी सध्या रक्तदान करण्यास उपलब्ध नाही. त्यामुळे 'कामा' सारख्या संघटना रक्तदान शिबिराचे आयोजन करीत असल्याचे स्वागत आहे. तसेच जिल्ह्यातील संस्था-संघटनांनी रक्तदान शिबिराचे आयोजन करावे असे आवाहन डॉ.गिरीश चौधरी यांनी केले.

काही लोकांना रक्तदानाची इच्छा असूनदेखील मात्र डायबिटीस, रक्तदाब, थायराॅईड तसेच हृदयविकाराचा आजार यांसारख्या असाध्य रोगामुळे गोळ्या सुरू असल्याने इच्छा असूनही रक्तदान करता येत नसल्याने सायंकाळी ४ वाजता शिबीर संपेपर्यंत साधारणतः १०० लोकांनी रक्तदान केले नंतर रक्तसाठा करण्याच्या पिशव्या संपल्याने शिबिर बंद करण्यात आल्याची खंत संघटनेचे कार्याध्यक्ष देवेन सोनी यांनी प्रसिध्दी माध्यमांसमोर व्यक्त केली. सदर आयोजलेले रक्तदान शिबीर यशस्वी करण्याकरिता 'कल्याण अंबरनाथ मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन'(कामा) संघटनेचे अध्यक्ष राजू बेलूर, कार्याध्यक्ष देवेन सोनी, उपाध्यक्ष नारायण माने, सचिव अमोल येवले, माजी अध्यक्ष श्रीकांत जोशी तसेच सुरक्षा समितीचे अध्यक्ष बाबजी चौधरी यांनी परिश्रम घेतले.


« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत