BREAKING NEWS
latest

रेल्वे प्रवाशांच्या हातावर फटका मारून मोबाईल फोन चोरास गुन्हे शाखा, घटक-३ कल्याण च्या पोलीसांनी शिताफीने केले जेरबंद..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

रेल्वे प्रवाशांच्या हातावर फटका मारून त्यांचे जवळील महागडे मोबाईल फोन चोरी करणारा इसम मुंब्रादेवी कॉलनी, दिवा पूर्व येथे सदर मोबाईल फोन विक्री करण्याकरीता येणार असल्याबाबत गुन्हे शाखा, घटक-३, कल्याण मधील पोलीस नाईक सचिन वानखेडे यांना त्यांच्या गुप्त बातमीदारातर्फे मिळाली होती.

सदर मिळालेल्या माहीतीच्या आधारे आज दि. २६/११/२०२३ रोजी व.पो.निरी. नरेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उप निरी. संजय माळी व पथकाने सापळा रचुन मुंब्रादेवी कॉलनी, दिवा (पुर्व) येथे ०१:३५ वाजता इसम नामे. अक्षय विठ्ठल वांडरे (वय: २७ वर्षे) रा. गणेश अपार्टमेन्ट, रूम नं. ०७, पहिला माळा, मुंब्रादेवी कॉलनी, रिलायंन्स टॉवर जवळ, दिवा (पुर्व) यास मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले. त्यास ताब्यात घेवून त्यांची अंगझडती घेतली असता त्याच्याकडून १) Oppo कंपनीचा CPH2269 मॉडेलचा गोल्डन रंगाचा मोबाईल फोन २) Vivo कंपनीचा 19 मॉडेलचा मॅस्टीक सिल्व्हर रंगाचा मोबाईल फोन असे ३६,९९०/- रूपये किंमतीचे दोन मोबाईल फोन हस्तगत केले आहेत. तसेच सदर आरोपी हा सराईत अट्टल गुन्हेगार असून त्याचे विरूद्ध दादर - २, कुर्ला - १, ठाणे - १, मुंबई सेंन्ट्रल -१ असे लोहमार्ग पोलीस ठाण्यात चोरी, जबरी चोरी असे बरेच गंभीर गुन्हे दाखल आहेत.

सदर कारवाई शिवराज पाटील साो, मा. सहा. पोलीस आयुक्त निलेश सोनावणे साो, यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, घटक-३, कल्याणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेश पवार, पोलीस उप निरीक्षक संजय माळी, पो.हवा. अनुप कामत, बालाजी शिंदे, बापूराव जाधव, पो.ना. सचिन वानखेडे यांनी यशस्वीपणे केली आहे.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत