BREAKING NEWS
latest

डोंबिवलीकरांच्या तुफान गर्दीत 'मिराज मल्टीप्लेक्स' मध्ये भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया विश्वचशकाच्या अंतिम सामन्याचे थेट प्रक्षेपण..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली: दि १९ नोव्हेंबर - डोंबिवलीतील पेंडसे नगर येथे गेले ३ वर्षांपासून 'मिराज मल्टीप्लेक्स' हे सिनेमागृह अस्तित्वात असून त्यामध्ये ३ पडद्यांवर एकाच वेळी ३ वेगवेगळ्या सिनेम्यांचं प्रदर्शन होत असते. अशातच यंदा क्रिकेट खेळातील 'विश्वचषक २०२३' मध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अंतिम सामना होत असल्याने त्याचे औचित्य साधून 'मिराज मल्टीप्लेक्स' च्या ३ पैकी एका पडद्यावर त्याचे थेट प्रक्षेपण प्रदर्शित करण्यात आले. १६२ बसण्याची क्षमता असलेल्या या स्क्रीनचे बुकिंग हाऊसफुल झाले असून या सिनेमागृहात प्रेक्षकांनी उत्साहाने हलकल्लोळ माजवत उदंड प्रतिसाद दिला.
२१ शहरांमधल्या ३०  मल्टीप्लेक्समध्ये मोठ्या स्क्रीनवर विश्वचषक २०२३ च्या अंतिम सामन्याचा थेट प्रक्षेपणाचा अनुभव 'मिराज सिनेमाज', जी भारतातील तिसरी सर्वात मोठी आणि सर्वात वेगाने वाढणारी राष्ट्रीय मल्टीप्लेक्स साखळी असून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बहु‌चर्चित व बहूप्रतिक्षित विश्वचषक २०२३ चा अंतिम सामना आज १९ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजल्या पासून मोठ्या स्क्रीनवर दाखविण्यात येत आहे. याला डोंबिवलीकरांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळाला. त्याच्या आगाऊ तिकिटाबद्दल प्रतिसाद व भारताच्या विजयी वाटचालीदरम्यान, डोंबिवलीतील 'मिराज मल्टीप्लेक्स'चे ड्युटी मॅनेजर राजेश यादव म्हणाले, या विश्वचषकात भारताचा विजय निश्चित आहे आणि आम्ही तशी त्यांना शुभेच्छा देत एका भव्य उत्सवाची तयारी केली आहे. एका अनोख्या सिनेमॅटिक फॉरमॅटमध्ये पुन्हा तयार केलेला, दर्शकांसाठी आम्ही स्टेडियममारखा अनुभव व प्रेक्षकांचे मनोरंजन नवीन उंचीवर नेण्यासाठी आम्ही खास फूड बेव्हरेज कॉम्बॉज तयार केले  आहेत.
ते पुढे म्हणाले की, याशिवाय आम्ही अनेक तयारी केली असून, लोकांचा क्रिकेट साठी प्रेम तसेच असलेला उत्साह लक्षात घेऊन लोकांना आकर्षक दृश्ये देण्यासाठी आम्ही स्टेडियमसारखी सजावट केली आहे. आम्हाला हे जाहीर करताना आनंद होत आहे की ७०-८० टक्के तिकिटे आधीच आरक्षित झाली आहेत व ऑनलाईन पद्धतीने आमच्या <www.mirajcinemas.com>  या बेबसाईट वरून सुरूच आहेत. सुरुवातीला आमच्याकडे २१ ठिकाणे होती आणि आता आम्ही २१ शहरांमध्ये जवळपास ३० ठिकाणी सामने दाखवण्याची व्यवस्था केली आहे. 
'मिराज सिनेमा' प्रेक्षकांचा क्रिकेट पाहण्याचा अनुभव एका संस्मरणीय दिवसात बदलण्यासाठी सबब आहे. दिल्ली एनसीआर, मुंबई, पुणे, कोलकाता, सुरत, अहमदाबाद, जयपूर, जोधपूर, नाथद्वारा, रांची, अकोला, अमरावती, चंद्रपूर, हिस्सार, सोनीपत, अबोहर यासह इतर काही शहरांमध्ये विश्वचषक अंतिम सामन्याचे थेट स्क्रीनिंग उपलब्ध करण्यात आले आहे तसेच गुरदासपूर आणि होशियारपुर मधील निवडक मिराज सिनेमांमध्ये केले आहे असे प्रसिद्धी माध्यमांना सांगण्यात आले.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत