BREAKING NEWS
latest

जलते दिए 🪔

जलते दिए 🪔

रोहन दसवडकर

हिंदू धर्मात दिवाळी या सणाला विशेष महत्व आहे. धनत्रयोदशीपासून ही दिवाळी सुरू होऊन अगदी तुळशी विवाह समारंभापर्यंत दिवाळीचा झगमगाट, फराळाच्या सुगंधाचा घमघमाट, फटाक्यांचा कडकडाट, आणि आपल्या माणसांचा स्नेह हे सारे काही टिकून राहते. दिवाळीच्या पहिल्या दिवशी अभ्यंग स्नान करून घरच्या कुलदेवतेची, इष्ट देवतेची, गणेशाची, माता सरस्वती यांची पूजा केली जाते. त्यानंतर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी माता लक्ष्मीची आराधना केली जाते. दिवाळीच्या या सणांमध्ये घराबाहेर सर्वत्र मातीचे दिवे प्रज्वलित केले जातात. माती पासून अगदी वेगवेगळ्या आकारांमध्ये बनवलेले हे दिवे दिवाळीमध्ये जणू प्रकाशाचे रंग भरतात. 

हिंदू धर्मातला हा सण दिवाळी कार्तिक महिन्यातील अमावस्येला साजरा केला जातो. लोक घराबाहेर, तुळशी समोर मातीचे दिवे लावतात. रामायणात असे सांगितले आहे की, लंकेचा राजा रावणाचा वध करून जेव्हा भगवान श्रीराम,पत्नी सीता आणि भाऊ लक्ष्मण यांच्यासह अयोध्येला परतले तेव्हा त्या दिवशी संपूर्ण अयोध्या नगरी दिव्यांनी उजळून निघाली होती. 14 वर्षांच्या वनवासानंतर भगवान रामाचे अयोध्येत आगमन झाल्यामुळे दिवाळी साजरी करण्यात आली. प्रत्येक गावात दिवे लावले गेले. तेव्हापासून दिवाळीचा हा सण अंधारावर विजय मिळवण्याचा सण बनला आणि दरवर्षी साजरा केला जाऊ लागला. 14 वर्षाचा वनवास संपवून श्रीराम या दिवशी अयोध्येला परतले होते. त्यावेळेस अयोध्यवासीयांनी रांगोळी आणि दिव्यांनी संपूर्ण अयोध्या सजवली होती. आणि तेव्हापासूनच दिवाळी हा सण साजरा होऊ लागला. 

    मात्र दिवाळीत हे मातीचेच दिवे का लावले जातात? असा प्रश्न कधी ना कधी आपल्याला पडलाच असेल त्याचं कारण आपण जाणून घेऊया. दिवाळी मध्ये मातीचा दिवा प्रज्वलित करण्याला फार महत्त्व आहे. ज्योतिष शास्त्रानुसार मंगळ हा माती आणि जमीनीचा कारक मानला जातो. मोहरीचे तेल शनि ग्रहाशी संबंधित आहे. यामुळेच माती आणि मोहरीच्या तेलाचे दिवे लावून मंगळ आणि शनि दोन्ही बलवान होतात. ज्यामुळे शुभ फल मिळते. जर एखाद्या व्यक्तीचे मंगळ आणि शनि बलवान असतील तर त्याला धन, संपत्ती, सुख आणि वैवाहिक जीवनात सर्व सुख प्राप्त होते. असे ज्योतिष शास्त्र सांगते. 

मातीचे दिवे लावल्याने सकारात्मक उर्जा संचारते जी जीवनात आनंद टिकवून ठेवते. मातीचा दिवा हा पंच तत्वांचा निरूपण मानला जातो. खरे तर सर्व काही मातीच्या दिव्यात सापडते. दिवे हे माती आणि पाण्यापासून बनवले जातात. ते जाळण्यासाठी अग्नि लागते आणि हवेमुळे आग लागते. त्यामुळेच दिवाळीच्या शुभमुहूर्तावर फक्त मातीचे दिवे लावले जातात. अंधकारावर प्रकाशाने मात करावी आणि दाही दिशा उजळून निघाव्यात अगदी मातीच्या दिव्याने तसाच दिवाळी मध्ये अंधकार दूर होतो. आणि ही दिवाळी सर्वांसाठीच सुखद आणि प्रकाशमय होते.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत