डोंबिवली: दिनांक - १७ नोव्हेंबर.
कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या इतिहासात प्रथमच आयुक्तपदी महिला आयुक्त लाभल्या आहेत. महिला कोणत्याही क्षेत्रात मागे नाहीत. पुरूषाच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. इसरो तर्फे चांद्रयान च्या अंतराळ मोहिमेत महिलांचा जास्त सहभाग होता हे संपूर्ण जगाने पाहिले व अनुभवले आहे. नव्या आयुक्त यांनी पुर्वी रत्नागिरी जिल्ह्यात आणि मंत्रालयात काम केलं आहे. त्याच्याकडून कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या क्षेत्रातील विकासाची चांगली कामे होतील.
- खासदार डॉ.श्रीकांत शिंदे
राज्य सरकार कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत नवनवीन आयुक्तांची निवड विद्यमान आयुक्तांचा कार्यकाळ संपण्याच्या आधीच करून टाकते. त्यामुळे आमच्याकडे येणाऱ्या आयुक्तांची अवस्था ही फेरीवाल्यांसारखी झाली आहे. परंतु आमच्या स्टेशन बाहेरचे काही उठवले जात नाही. असो ! आता येणाऱ्या नवीन महिला आयुक्त नक्कीच चांगले बदल करतील, अशी आशा अपेक्षा करूया, त्यांचे कल्याण-डोंबिवली मनसे स्वागत.
- राजू पाटील, मनसे आमदार
कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या आयुक्तपदी कर्तबगार महिलाआयुक्त म्हणून डॉ. इंदुराणी जाखड यांची तडकाफडकी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचे स्वागत करीत असतांना कल्याण-डोंबिवली महापालिकेला भ्रष्टाचारी व निलंबित कर्मचारी म्हणून लागलेला शाप पुसून टाकून, प्रथमच नवीन आयुक्तपदी आलेल्या महिला आयुक्त कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या कारभार चांगला करून महापालिकेचा परत नावलौकिक मिळवला जाईल अशी अपेक्षा.
- बापू वैद्य (ज्येष्ठ पत्रकार) डोंबिवली
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा