BREAKING NEWS
latest

मराठा आरक्षणाचा प्रश्न तीन टप्प्यात संपेल - चंद्रकांत पाटील

प्रतिनिधी: अवधुत सावंत

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकारकडून जोरदार  प्रयत्न सुरू असले तरी नेमकं टिकणारं आरक्षण कधी मिळणार ? याबाबत अद्याप सरकार कडून स्पष्टता आली नाही. दरम्यान, भारतीय जनता पक्षाचे नेते आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सूचक विधान केलं आहे. तीन टप्प्याने मराठा आरक्षणाचा प्रश्न संपेल, असं विधान चंद्रकांत पाटील यांनी केलं. आज पुण्यातील सर्वपक्षीय 'वाडेश्वर कट्टा' कार्यक्रमाला हजेरी लावली. तेव्हा ते प्रसिद्धी माध्यमांशी बोलत होते.

चंद्रकांत पाटील म्हणाले, “राज्यात तीन कोटी लोकसंख्या असलेला मराठा समाज आणि साडे तीन कोटी लोकसंख्या असलेला ओबीसी समाज आहे. अशा सात कोटी समाजाच्या सर्वसामान्य माणसांच्या मनामध्ये एकमेकांबद्दल तिरस्कार निर्माण होत आहे. त्यामुळे तुम्हीही आणि ओबीसी नेत्यांनी याची काळजी घेतली पाहिजे. आपल्या संत महंतांनी जी सामाजिक वीण गुंफली आहे, ती तोडणं किंवा जोडणं आपलं काम नाही. त्यामुळे तीन टप्प्याने मराठा आरक्षणाचा प्रश्न संपेल."
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत