BREAKING NEWS
latest

डोंबिवली जिमखान्यातील 'उत्सव २०२३' रंगतदार सोहळ्याचा शुभारंभ बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते संपन्न..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली दि.२३ :  डोंबिवली जिमखाना येथील 'म्हैसकर स्पोर्ट्स सेंटर' या डोंबिवलीतील १९८३ सालापासून अग्रगण्य असलेल्या संस्थेच्या पटांगणावर यंदा २६ वे वर्ष असलेल्या 'उत्सव २०२३' या रंगतदार सोहळ्याचा शुभारंभ राज्याचे बांधकाम मंत्री नामदार रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आला. त्यावेळी सोबत जिमखान्याचे अध्यक्ष दिलीप भोईर, सचिव पर्णाद मोकशी, खजिनदार आनंद डीचोलकर, पितांबरी चे मधुकर पुजारी व महाराष्ट्र टाईम्स चे प्रवीण मुळे उपस्थित होते. सर्वासाठी सर्व काही' म्हणत २५ वर्षानंतरही तोच उत्साह आणि उमेद घेऊन रंगणारा डोंबिवलीकरांसाठी आनंदाची आणि खरेदीची पर्वणी घेऊन येणारा डोंबिवली जिमखाना आयोजित 'उत्सव २०२३' यंदा २३ ते ३१ डिसेंम्बर या दरम्यान जिमखाण्याच्या पटांगणावर होणार आहे. वेगवेगळ्या उत्पादकांनी आपल्या उत्पादनासाठी योग्य आणि साजेशी बाजारपेठ म्हणून उत्सवला कायमंच वरचे स्थान दिले असून यंदाही त्यांचा उत्साह तसाच आहे 'उत्सव २०२३' मधील १४० स्टॉलचे बुकिंग झाले असून खरेदी बरोबरच अम्यूझमेंट पार्क, फूड स्टॉलचा आनंद देखील डोंबिवलीकरांना घेता येणार आहे. 
राम मंदिराच्या प्रतिकृती चे खास आकर्षण

यंदाचे एक वेगळे खास आकर्षण म्हणजे 'श्रीराम मंदिराची प्रतिकृत्ती' साकारण्यात आली असून ज्याची लांबी रुंदी २५ x ५० फूट असून उंची ४० फूट आहे. जेणेकरून भाविकांना प्रत्यक्ष आत जाऊन प्रभू श्रीरामांचे दर्शन घेता येईल. ह्याचे सर्व श्रेय 'डोंबिवलीकर एक सांस्कृतिक परिवार' ह्यांना दिले जाते.
उत्सवच्या माध्यमातून मिळणारे उत्पन्न जिमखान्याच्या मैदानाच्या देखभाल दुरुस्तीसह विविध खेळाची मैदाने तयार करण्यासाठी खर्च केले जाते. यंदाही उत्सवचे सर्व १४० स्टॉल बुक झाल्यामुळे ग्राहकांना खरेदीचा आनंद मनमुराद लुटता येणार आहे. उत्सव २०२३ च्या व्यासपीठावरून डोंबिवलीतील विविध सांस्कृतिक संस्था, शाळांचे वि‌द्यार्थी विविध कलागुण सादर करणार आहेत. तर 'झीटीव्ही'चे लाडके कलाकार उत्सवच्या आठ दिवसांच्या कालावधीत प्रेक्षकांच्या, रसिकांच्या भेटीला येणार आहेत. सांस्कृतिक परंपरेबरोबरच सामाजिक भान जपताना पोलीसांच्या माध्यमातून 'सायबर गुन्हे' रोखण्याबाबत जनजागृतीपर पथनाट्य या व्यासपीठावरून सादर केले जाणार आहे. डोंबिवली आणि परिसरातील एक लाख शालेय विध्यार्थ्यांना 'उत्सव २०२३'चे मोफत पास उपलब्ध करून देण्यात आले आहेत. कल्याण लोकसभेचे लाडके खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे फाऊंडेशनने उत्सवचे मुख्य प्रायोजकत्व स्विकारले असून सालाबादप्रमाणे 'डोंबिवलीकर एक सास्कृतिक परिवार' गेली १३ वर्षे उत्सवचे प्रायोजक आहेत. देशभरात नावाजलेल्या पितांबरीने दरवर्षी प्रमाणे यंदाही उत्सवला सहप्रयोजकत्व दिले आहे असे जिमखान्याचे पदाधिकारी पर्णाद मोकशी (मा. सचिव), डॉ. प्रमोद बाहेकर (उपाध्यक्ष), आनंद डीचोलकर (खजिनदार)  व शेखर पाटील (सह-सचिव) यांनी प्रसिद्धी माध्यमांना सांगितले.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत