BREAKING NEWS
latest

२२ जानेवारीला दिवाळी साजरी करण्याकरिता डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते डोंबिवलीकरांना डाळ-साखरेचं वाटप..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबवली दि.१३: अयोध्या नगरीत दि.२२ जानेवारी रोजी प्रभू श्रीराम यांच्या मंदिराचा भव्यदिव्य प्राण प्रतिष्ठा सोहळा आयोजित करण्यात येत असून त्यानिमित्ताने कल्याण लोकसभेचे लोकप्रिय खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे  यांनी त्यादिवशी राज्यात दिवाळी साजरी करण्यात यावी असे आवाहन केले आहे. त्यानिमित्ताने आज त्यांच्या माध्यमातून त्यांनी कल्याण-डोंबिवली च्या माजी महापौर विनिता राणे यांच्या प्रभागात नागरिकांना डाळ आणि साखरेचे शिधावाटप केले. हजारोंच्या संख्येने नागरिकांनी याचा लाभ घेण्यासाठी भल्या मोठ्या रांगा लावल्या होत्या.
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आपण या कल्याण लोकसभेमध्ये साखर आणि डाळ याचं वाटप आपण करतोय कारण येत्या २२ तारखेला आपल्या सगळ्यांच्या ज्या भावना होत्या आपल्या अनेक पिढ्या ज्याची वाट पाहत होते असं प्रभू श्रीरामांचं मंदीर अयोध्या मध्ये उभं राहतं असून त्याठिकाणी प्रभू श्रीराम यांची प्राणप्रतिष्ठा स्थापना होत आहे. या मंगलमय समयी संपूर्ण देश राममय झालेला असून सगळी लोकं येत्या २२ तारखेची आतुरतेने वाट पहात आहेत. गेली अनेक वर्षे अनेक पिढ्या प्रभू श्रीरामांचं मंदिर कधी होईल याची वाट पहात होती की तब्बल ५०० वर्ष वाट पाहिल्यानंतर प्रभू श्रीरामांचं मंदिर उभं राहतं असून आपल्या सगळ्यांसाठी आनंदाचा आणि अभिमानाचा हा क्षण आहे कारण याच्या मध्ये अनेक हुतात्मे, अनेक बलिदान तसेच अनेक आंदोलने झाली त्यानंतर ह्या मंदिराची उभारणी झाली असून यानंतरची पिढी प्रभू श्रीरामांचं दर्शन भव्यदिव्य मंदिरात घेतील. १४ वर्षांच्या वनवासानंतर प्रभू श्रीराम जेव्हा अयोध्येत परतले होते तेव्हा दिवाळी साजरी करण्यात आली होती तसाच क्षण पुन्हा येत असून देशात सगळ्यांनी घराघरात पणत्या पेटवून दिवे लावून रोषणाई करत दिवाळी साजरी करावी असे बोलून दाखविले. 
यावेळी या शिधावाटप कार्यक्रमात माजी महापौर विनिता राणे, विश्वनाथ राणे, उपजिल्हाप्रमुख राजेश कदम, डोंबिवली शहर अध्यक्ष राजेश मोरे, युवासेना सचिव दीपेश म्हात्रे, युवासेना शहर अधिकारी सागर जेधे, कार्यालय प्रमुख प्रकाश माने, डोंबिवली विधानसभा सचिव संतोष चव्हाण, अभिजीत दरेकर, गजानन व्यापारी अनेक शिवसैनीक तसेच पोलीस बंदोबस्त सांभाळण्यासाठी परिमंडळ-३ चे पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ, विष्णूनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहन खंदारे उपस्थित होते.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत