BREAKING NEWS
latest

बांधकामावर तोडक कारवाई करण्याचा अर्ज मागे घेण्याकरिता रुपये ५० हजारांची खंडणी मागणाऱ्यास खंडणी विरोधी पथक, गुन्हे शाखा, ठाणे शहर पोलीसांकडून अटक..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

उल्हासनगर: येथील तक्रारदार संदीप पंडीत गायकवाड उर्फ पप्पु, हे व्यवसायाने बिल्डर असून म्हारळ सोसायटी, समर्थ कृपा अपार्टमेंट, ता: कल्याण जि: ठाणे येथे राहत असलेले व्यवसायीक हे उल्हासनगर शहरामध्ये बांधकामाची कामे करीत असतात. त्यांचे सध्या हार्दिक ज्वेलर्सचे पाठीमागे, सावंत चाळीच्या बाजुला, शिव रोड, उल्हासनगर नंबर १ येथे सुरू असलेल्या बांधकामावर तोडक कारवाई करण्यात यावी याबाबत शांताराम शेळके याने उल्हासनगर महानगरपालिकेत तक्रारी अर्ज करून सदर तक्रारी अर्ज मागे घेण्यासाठी ५०,०००/- रूपयाची खंडणीच्या रक्कमेची मागणी केल्याबाबत मा.पोलीस उप आयुक्त, गुन्हे, ठाणे शहर कार्यालयात दिनांक १५/०१/२०२५ रोजी तक्रार अर्ज केला होता. 

सदर तक्रारी अर्जाच्या अनुषंगाने मा.वरिष्ठांनी कारवाई करणेबाबत आदेशीत केले होते. त्या अनुषंगाने खंडणी विरोधी पथक, गुन्हे शाखा, ठाणे शहर कडून सापळा कारवाई करण्यात येवुन तक्रारदार संदिप गायकवाड यांच्याकडून ५०,०००/- रूपये खंडणीची रक्कम स्विकारतांना  आरोपी शांताराम जानु शेळके (वय: ४८ वर्षे) धंदा: कारपेंटर, रा. शेळके निवास, माने चाळ, २३/२६ मराठी शाळेजवळ, विर तानाजीनगर, उल्हासनगर नं. १, जि: ठाणे. हा भारतीय कामगार कर्मचारी महासंघ प्रणित असंघटीत कामगार महासंघाचा वार्ड अध्यक्ष असून त्याला  दिनांक १६/०१/२०२४ रोजी १८:२५ वाजता खंडणीची रक्कम घेताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. त्याच्या विरोधात तक्रारदार संदिप गायकवाड यांनी दिलेल्या तक्रारीवरून उल्हासनगर पोलीस स्टेशन गु.र.नं. ४९/२०२४  भा.दं.वि. कलम ३८४,३८६,५०६ (२) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असून नमुद गुन्ह्यात आरोपी शांताराम शेळके यास अटक करण्यात आली असून त्याची दिनांक २०/०१/२०२४ पर्यंत पोलीस रिमांड कोठडी मिळविण्यात आली आहे. पुढील तपास सपोनि. सुनिल तारमळे हे करीत आहेत. 
सदरची कारवाई मा.वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथक, गुन्हे शाखा ठाणे शहरचे वपोनि.शेखर बागडे, सपोनि.सुनिल तारमळे, भुषण कापडणीस, सपोउनि. संजय बाबर, पोहवा.गणेश गुरसाळी, संजय राठोड, मपोहवा.शितल पावसकर, मपोशि.मयुरी भोसले, चापोना.भगवान हिवरे यांनी केली आहे.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत