प्रतिनिधी: अवधुत सावंत
डोंबिवली : केडीएमसीचे माजी सभापती आणि डोंबिवली पश्चिमेकडील भाजपचे माजी नगरसेवक विकास म्हात्रे व त्यांच्या पत्नी माजी नगरसेविका कविता म्हात्रे यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह भाजप सदस्यत्व पदाचा राजीनामा दिला आहे. विकास म्हात्रे यांनी मंगळवारी डोंबिवली पश्चिम भाजप अध्यक्ष समीर चिटणीस यांच्याकडे मंगळवारी त्यांचा हा राजीनामा सुपूर्द केला आहे. म्हात्रे यांच्या या राजीनामाच्या नाट्याने डोंबिवलीत खळबळ उडाली आहे. केंद्रात आणि राज्यात सत्ता असतानाही प्रभागात विकास कामासाठी निधी मिळत नसल्याने म्हात्रे यांसह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते नाराज असून याच नाराजीतून हा राजीनामा म्हात्रे यांनी दिल्याचे सर्वत्र बोलले जात आहे.
कल्याण-डोंबिवलीत भाजपला धक्का
विकास म्हात्रे यांनी शिवसेना (शिंदे गट) पक्षात यावे, आम्ही त्यांचे खुलेआम स्वागत करु, कल्याण लोकसभेचे लोकप्रिय खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून भरघोस निधी मिळू शकतो, आमच्या पक्षात विकास म्हात्रे यांनी यावे, अशी खुली ऑफरच युवासेनाचे सचिव आणि केडीएमसी माजी सभापती दीपेश म्हात्रे यांनी दिली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा