BREAKING NEWS
latest

सिद्धार्थ नगर झोपडपट्टीतील वंचितांनी केला माणिक उघडे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली दि. ०१ जानेवारी - डोंबिवली झोपडपट्टीतील वंचितांच्या हक्कासाठी कायम लढणारे आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट)  झोपडपट्टी महासंघाचे अध्यक्ष माणिकराव उघडे यांचा वाढदिवस सिद्धार्थ नगर मधील झोपडपट्टी धारकांनी मोठ्या उत्साहात १ जानेवारी रोजी स्व.मिनाताई ठाकरे उद्यानात साजरा केला. यावेळी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे ज्येष्ठ नगरसेवक आणि स्थायी समितीचे माजी सभापती रमेश सुकऱ्या म्हात्रे तसेच रिपाईचे राष्ट्रीय सचिव दयाल बहादूर, जिल्हाध्यक्ष महिला आघाडी मीनाताई, एडव्होकेट शंभरकर, जनरल मजदुर संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मणराव मिसाळ, प्राध्यापक शुक्राचार्य गायकावाड आणि इतर मान्यवर मंडळी उपस्थित होती.
वाढदिवसाच्या निमित्ताने रमेश म्हात्रे यांनी माणिकराव उघडे यांचा शाल व पुष्पहार देऊन सत्कार केला. कायम झोपडपट्टी धारकांसाठी लढणाऱ्या माणिकराव उघडे यांनी आयुष्यात रिपाई पक्षासाठी वरिष्ठ पदाधिकारी यांच्याकडून अपमानास्पद वागणूक सुद्धा सहन करत टिकून राहिले. मात्र झोपडपट्टीतील गरीब वंचित जनतेची साथ सोडली नाही. झोपडपट्टी वाचवण्यासाठी आणि पुनर्वसन करण्यासाठी ते कायम त्यांच्यासोबत अग्रस्थानी आहेत व त्यासाठी लढा देत आहेत. त्यामुळे इतक्या मोठ्या संख्येने लोकं उपस्थित आहेत असे प्रसिद्धी माध्यमांसमोर सांगितले. तर माणिक उघडे म्हणाले की मी जालना या दुष्काळग्रस्त जिल्ह्यातून आलो असून, आयुष्य काबाडकष्टात गेले असले तरी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारावर चालत आहे व रिपाईचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्यासोबत गेली अनेक वर्ष पक्षाचे काम करीत आहे.
वाढदिवसानिमित्त मोठ्या संख्येने जमलेल्या नागरिकांचे त्यांनी यावेळी आभार मानले. यावेळी  सह्याद्री सामाजिक संस्थेचे अध्यक्ष नवनाथ मोरे, राष्ट्र स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष लक्ष्मणराव अंभोरे, पार्टीचे नेते दामू काकडे,  रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे  डोंबिवली अध्यक्ष संजय पवार,  रिपब्लिकन युवक आघाडी चे डोंबिवली शहराध्यक्ष विकास खैरनार, वैशाली सावर्डेकर, महादू सिंग उर्फ राणा शेठ, समाजसेवक रेखा कांबळे, सुनिता खरात, बाई पवार, समाजसेविका शशी पवार, समाजसेवक पंचांगे ,  गणेश मोहिते, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीचे गरुड, आरपीआयचे संपर्क जिल्हाप्रमुख तुकाराम पवार, मंगेश कांबळे, आरपीआयचे संघटक विठ्ठल खेडकर, आरपीआय शहर उपाध्यक्ष डोंबिवलीचे वसंत टेकाळे, आरपीआय जिल्हा संघटक राजू धोंडे, समाजसेवक मनोज बैसाणे, मनोज भुंगे, माया मोरे, सिद्धार्थ नगर महिला मंडळाच्या सर्व महिला आघाडी आणि नागरिक वाढदिवसाप्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत