BREAKING NEWS
latest

युवा सेना सचिव दीपेश म्हात्रे यांनी प्रभागात केले 'शासन आपल्या दारी' शिबिराचे आयोजन..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली दि.९ :  केंद्र शासन, राज्य शासन आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व शासकीय योजनांचा लाभ एकाच छताखाली नागरिकांना मिळण्याकरिता शिवसेना युवा सेनेचे सचिव दीपेश म्हात्रे यांच्यातर्फे आपल्या ठाकूरवाडी प्रभागात कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या माध्यमातून 'शासन आपल्या दारी' शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिका व शासनाच्या सर्व विभागाच्या माध्यमातून 'शासन आपल्या दारी' ही योजना आपण ठाकूरवाडी येथे नागरिकांसाठी कुठल्याही प्रकारचे शुल्क न आकारता मोफत राबवत असल्याने या योजने अंतर्गत महापालिका, महाराष्ट्र विद्युत सेवा तसेच केंद्र सरकार, राज्य सरकार यांचे इतर उपक्रम लोकांपर्यंत पोचवून त्यांना त्याचा लाभ कसा करून घेता येईल याबाबत नागरिकांना त्याची माहीती उपलब्ध व्हावी त्यासाठी मार्गदर्शन करून त्यांची नोंदणी करून घेत असल्याचे दीपेश म्हात्रे यांनी प्रसिद्धी माध्यमांना सांगितले.
डोंबिवली पश्चिम येथील ठाकूरवाडी परिसरात या भव्य दिव्य शासकीय योजना शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी युवा सेना महाराष्ट्र राज्य सचिव तथा माजी स्थायी समिती सभापती दिपेश म्हात्रे यांच्या  विशेष सहकार्य आणि त्यांच्या प्रमुख उपस्थितीत या शिबिरात परिसरातील नागरिकांना एकाच छताखाली शासकीय योजनांचा लाभ  उपलब्ध करण्यात आला होता. 'शासन आपल्या दारी' या योजने अंतर्गत उत्पन्नाचा दाखला, डोमिसाईल दाखला/रहिवासी दाखला, संजय गांधी निराधार योजना, रेशनकार्ड सेवा, आधार कार्ड सेवा, रहिवासी स्थानिक वास्तव्याचा दाखला, प्रधानमंत्री आवास योजना, प्रधानमंत्री स्वनिधी योजना, प्रधानमंत्री मातृत्व योजना, आरोग्य तपासणी, जननी सुरक्षा योजना, आयुष्मान भारत कार्ड/आभा कार्ड, दिव्यांग कल्याणकारी योजना व साहित्य वाटप, महिला व बालकल्याण विभागातील योजना, ज्येष्ठ नागरिक दाखला, जात प्रमाणपत्र, बांधकाम कामगाराच्या योजना, किसान सन्मान योजना 'शासन आपल्या दारी' या अभियानांतर्गत राबविण्यात आल्या. या योजनेचा परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घेतला. यावेळी 'ह' प्रभाग क्षेत्र अधिकारी राजेश सावंत, विजय भोईर, जयराम शिंदे, सुशील सुतार तसेच महापालिकेचे अधिकारी कर्मचारी वर्ग उपस्थित होता.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत