डोंबिवली : फियार्दी सुशांत शशीकांत पालकर (वय:३१ वर्षे) रा. रूम नं १०१, मनोमय बिल्डींग नं ८, अष्टविनायक गृह संकुल, फेज २, मु.पो: अदय ता: पनवेल, जि: रायगड यांची दिनांक ३१/०१/२०२४ रोजी घारडा कंपनी, डोंबिवली (पुर्व) या कंपनीचेे पार्कीग लॉट मधुन त्यांची होंडा युनिकॉर्न मोटार सायकल क्र.एमएच ०६ - बीएच ८९८६ ही चोरीस गेली होती. vत्याबाबत त्यांनी मानपाडा पोलीस ठाणे गु.र.नं . २०२/२०२४ भा.दं.वि.कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखा, घटक-३, कल्याण कडुन तपास करण्यात येत होता. दि. ०१/०२/२०२४ रोजी गुन्हे शाखा घटकातील पोलीस अंमलदार सचिन वानखेडे यांना मिळालेल्या गुप्त बातमीच्या आधारे सपोनि. संदिप चव्हाण व पथकाने तांत्रिक विश्लेशन व मिळलेल्या बातमीच्या आधारे सागर्ली, डोंबिवली (पुर्व) परिसरातुन कैलाश सुभाष जोशी उर्फ जे.पी. (वय:३८ब वर्षे) रा. त्रिमुती नगर रूम नं.५, शेलारनाका, डोंबिवली (पुर्व) व विक्रम उदय चौहाण (वय: ४८ वर्षे) रा. त्रिमुर्ती नगर झोपडपट्टी, गुडडु याची भाडयाची खोली, शेलारनाका, डोंबिवली (पुर्व) कायमचा पत्ता: मु.पो. इब्राहिमपुर, ता: गददीपुर, जि: आझमगड राज्य: उत्तर प्रदेश यांना मानपाडा पोलीस ठाणे गुन्हा रजि. नं. २०२/२०२४ भा.दं.वि कलम ३७९ मधील चोरीस गेलेली होंडा युनिकॉर्न मोटार सायकल सह ताब्यात घेवुन सदरचा गुन्हा २४ तासाच्या आत उघडकीस आणला आहे.
सदर नमुद आरोपींच्या गुन्हे अभिलेखाची पडताळणी केली असता आरोपीत कैलाश सुभाष जोशी उर्फ जे.पी. हा सराईत गुन्हेगार असुन त्याच्या विरूध्द खालील प्रमाणे गुन्हे दाखल आहेत.
१) कल्याण तालुका पोलीस ठाणे गुन्हा रजि.नं. ३४५/२०२० भा.दं.वि. ३९५ प्रमाणे
२) मानपाडा पोलीस ठाणे गुन्हा रजि.नं. १८६/२०१६ भा.दं.वि. ३७९ प्रमाणे
३) मानपाडा पोलीस ठाणे गुन्हा रजि.नं. २०१ /२०१६ भा.दं.वि. ३७९ प्रमाणे
४) मानपाडा पोलीस ठाणे गुन्हा रजि.नं. २०८/२०१६ भा.दं.वि. ३७९ प्रमाणे
५) मानपाडा पोलीस ठाणे गुन्हा रजि.नं. २९०/२०१६ भा.ह.का. ३७९ प्रमाणे
६) मानपाडा पोलीस ठाणे गुन्हा रजि.नं. ३४१/२०१६ भा.दं.वि कलम ४५४, ४५७, ३८० प्रमाणे दाखल आहेत.
सदर कारवाई मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), पंजाबराव उगले, मा.पोलीस उप आयुक्त (गुन्हे) शिवराज पाटील, मा.सहा.पोलीस आयुक्त निलेश सोनवणे, यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, घटक-३,कल्याणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेश पवार, पो.नि. राहुल मस्के, स.पो.नि. संतोष उगलमुगले, संदिप चव्हाण, पो.हवा. अनुप कामत, दत्ताराम भोसले, बालाजी शिंदे, विलास कडु, चालक पो.हवा. अमोल बोरकर, पो.ना. सचिन वानखेडे, पो.शि. विजेद्र नवसारे, विनोद चन्ने यांनी केली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा