BREAKING NEWS
latest

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत कोळे येथे ०३ मार्च २०२४ रोजी "शासन आपल्या दारी" या भव्य उपक्रमाचे आयोजन..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

कल्याण दि.०१ : डोंबिवलीतील कोळे येथे रविवार दिनांक ०३ मार्च २०२४ रोजी "शासन आपल्या दारी" हा कार्यक्रम भव्य स्वरुपात मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मा. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मा. उपमुख्यमंत्री अजित पवार, मा. केंद्रीय राज्य मंत्री (पंचायती राज) कपिल पाटील, मा. राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा पालकमंत्री शंभुराज देसाई, मा. सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण तसेच मा. खासदार श्रीकांत शिंदे व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत दुपारी ०२.०० वाजता संपन्न होणार आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड़ यांनी पत्रकार परिषदेत पत्रकारांशी बोलताना दिली. 

महापालिका क्षेत्रात दिनांक २९ जानेवारी २०२४ ते माहे फेब्रुवारी २०२४ या कालावधीत 'शासन आपल्या दारी' या उपक्रमांतर्गत संपन्न झालेल्या ४२ शिबीरात सुमारे २२,०५४ लाभार्थ्यांनी या योजनांचा लाभ घेतला. आता दिनांक ०३ मार्च २०२४ रोजी कोळे येथे संपन्न होणाऱ्या 'शासन आपल्या दारी' उपक्रमास लाभार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहुन शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहनही कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड़ यांनी यावेळी केले.

या कार्यक्रमात "माझी मिळकत माझी आकारणी" योजनेचे उद्घाटन, कल्याण पश्चिमेतील गोल्डन पार्क येथील ज्येष्ठ निरुपणकार तिर्थरुप डॉ. नानासाहेब धर्माधिकारी भाजी मंडईचे उद्घाटन, उंबर्डे, कल्याण (पश्चिम) येथील वाचनालय व अभ्यासिकेचे उद्घाटन ऑनलाईन स्वरुपात मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शुभहस्ते संपन्न होणार आहेत.

तत्पुर्वी डोंबिवलीमध्ये दुपारी ०१.०० वाजता सुतिकागृह (कॅन्सर रुग्णालय) चे भुमीपुजन मा. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचे शुभहस्ते प्रत्यक्ष स्वरुपात संपन्न होणार आहे. तसेच याचवेळी फिश मार्केट डोंबिवली (‍पश्चिम) चे ऑनलाईन भुमीपुजन, आयरे गाव डोंबिवली (पूर्व) येथील महाराष्ट्र भुषण नानासाहेब धर्माधिकारी सभागृहाचे ऑनलाईन भुमीपुजन तसेच शास्त्रीनगर रुग्णालयातील शवविच्छेदन केंद्र व नवजात शिशु अतिदक्षता विभाग (एनआयसीयु) चे ऑनलाईन लोकार्पण आणि डोंबिवली (पूर्व) सुनिलनगर येथील अभ्यासिकेचे ऑनलाईन उद्घाटन व लोकार्पण  हे कार्यक्रम देखील मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शुभहस्ते संपन्न होणार आहे.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत