BREAKING NEWS
latest

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे कर निर्धारण व संकलन विभागाचे कर भरण्याचे मालमत्ता धारकांना आवाहन..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडून मालमत्ता कर थकबाकीदारांना वेळोवेळी थकीत रक्कम भरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मात्र,काही थकबाकीदारांकडून योग्य प्रतिसाद मिळत नसल्यामुळे थकबाकीची रक्कम वसुल करण्यासाठी,अधिनियमातील तरतुदीनुसार नोटीस बजावून, स्थावर मालमत्ता जप्तीची कारवाई करण्यात आली, तरी देखील ज्या मिळकत धारकांनी आपली थकीत रक्कम भरलेली नाही अशा मिळकतींचा जाहिर लिलाव दि. ०८/०४/२०२४ रोजी करण्यात येणार आहे.

महानगरपालिकेने दि.३१ मार्च, २०२४ अखेर अभय योजना-२०२४ लागु केली आहे. यामध्ये, थकीत दंड/व्याज रक्कमेत ७५% सवलत दिली आहे. याचा थकबाकीदार यांनी लाभ घ्यावा, आपल्या मिळकतीवर लिलावाची कटू कारवाई करण्यापुर्वीच त्वरीत कराची थकबाकी भरावी व महापालिकेस सहकार्य करावे असे आवाहन महापालिकेच्या करनिर्धारण व संकलन विभागामार्फत करण्यात येत आहे.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत