डोंबिवली दि.२४ : कल्याण-डोंबिवली महापालिका परिसरातील डोंबिवलीत राहणारे शूरवीर कॅ. विनयकुमार सचान यांना मातृभूमीच्या रक्षणासाठी काश्मीर मध्ये दहशतवाद्यांशी लढताना २४ मार्च २००३ रोजी वीरमरण आले. त्यामुळे २४ मार्च या दिवशी कॅ. विनयकुमार सचान यांचे स्मृतीप्रित्यर्थ कल्याण-डोंबिवली महापालिकेतर्फे डोंबिवली येथील ह.भ.प. सावळाराम महाराज म्हात्रे क्रिडा संकुलातील त्यांच्या स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहण्यात येते.
आज कॅप्टन विनय कुमार सचान यांच्या स्मृती दिनी महापालिका आयुक्त डॉ. इंदु राणी जाखड़ यांनी, कॅ.विनय कुमार सचान स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली. यावेळी कॅ. विनयकुमार सचान यांचे माता-पिता, इतर कुटुंबीय तसेच महापालिका उपायुक्त अतुल पाटील, रमेश मिसाळ, माहिती व जनसंपर्क विभाग प्रमुख संजय जाधव, कार्यकारी अभियंता मनोज सांगळे, शैलेश मळेकर, सहा. आयुक्त चंद्रकांत जगताप, भारत पवार यांनी देखील कॅ. विनयकुमार सचान यांच्या स्मारकास पुष्पसुमने अर्पण करून आदरांजली वाहिली.
यासमयी इतर महापालिका अधिकारी, कर्मचारी वर्ग तसेच नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा