कल्याण दि.२३ : थोर स्वातंत्र्य सैनिक भगतसिंग, राजगुरु, सुखदेव यांचा स्मृतीदिनाच्या स्मरणार्थ "शहीद दिवस" म्हणून सर्वत्र ओळखला जातो. शहीद भगतसिंग, राजगुरु, सुखदेव यांच्या आजच्या पुण्यतिथी दिनी कल्याण-डोंबिवली महापालिकेतर्फे त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.
महापालिका मुख्यालयात महापालिका आयुक्त डॉ. इंदु राणी जाखड़, उपआयुक्त अवधूत तावडे, उप आयुक्त रमेश मिसाळ, विभागप्रमुख (माहिती व जनसंपर्क) संजय जाधव यांनी भगतसिंग, राजगुरु, सुखदेव यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.
या समयी उपस्थित माहिती व जनसंपर्क अधिकारी माधवी पोफळे, सहा.आयुक्त तुषार सोनावणे, हेमा मुंबरकर, सहा.सुरक्षा अधिकारी सुरेश पवार तसेच इतर कर्मचारी वर्ग यांनी देखील शहीद भगतसिंग, राजगुरु, सुखदेव यांच्या प्रतिमेस पुष्पसुमने अर्पण करून आदरांजली वाहिली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा