BREAKING NEWS
latest

डोंबिवलीत रिक्षा चोरांसह चैन स्नॅचिंग व घरफोडी करणारे अट्टल चोर मानपाडा पोलीसांच्या जाळ्यात..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली ०४: मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत रिक्षा चोरी, साेनसाखळी चाेरी व घरफोडीच्या घटना घडल्या होत्या. घरफोडी, चैन स्नॅचिंग, रिक्षा चोरीच्या गुन्ह्यातील अट्टल चोरट्यांना मानपाडा पोलीसांनी अटक केली आहे. रिक्षा चोरी आणि घरफोडीचे प्रत्येकी पाच, तर चैन स्नॅचिंगचा एक गुन्हा उघडकीस आला आहे. रिक्षा चोरीच्या गुन्ह्यात सात रिक्षांसह, घरफोडीच्या गुन्ह्यात चोरीला गेलेला १ लाख १९ हजार तर चैन स्नॅचिंगच्या गुन्ह्यातील १ लाख २० हजाराचा माल जप्त केला आहे. 
पूर्व प्रादेशिक विभाग कल्याणचे अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे, परिमंडळ-३ चे उपायुक्त सचिन गुंजाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील कुराडे, मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक (गुन्हे) राम चोपडे, पोनि. दत्तात्रय गुंड, सपोनि. महेश राळेभात, प्रशांत आंधळे, सपोउपनि. काटकर, संपत फडोळ, पोलीस कर्मचारी राजेंद्र खिलारे, सोमनाथ टिकेकर, संजू मासाळ, दीपक गडगे, सुनील पवार, माळी, निसार पिंजारी, रवींद्र हासे, यल्लपा पाटील, महादेव पवार, शांताराम कसबे, गणेश भोईर, प्रवीण किनरे, अनिल घुगे, चिंतामण कातकडे, महेंद्र मंझा, अशोक आहेर, नाना चव्हाण यांच्या पथकाने गुन्ह्याचा तपास सुरू केला. दि.२० जानेवारीच्या सागांव येथील चैन स्नॅचिंगच्या गुन्ह्याचा तपास करताना पोलीसांनी चार चैन स्नॅचर्सना गजाआड केेले आहे. स्वप्नील माधवानी उर्फ करकटया बाबु, कलीम शेख, जावेद शेख आणि इरफान शेख सर्व रा. मुंब्रा, कळवा अशी अटक आरोपींची नावे असून आरोपींविरोधात टिळकनगर, रामनगर, कळवा, चितळसर पोलीस ठाण्यात याआधी आठ गुन्हे दाखल आहेत.
घरफोडीच्या गुन्ह्यातील अफताब ईर्शाद मोमीन या सराईत चोरट्याला अटक केली असून साथीदार तौसिफ अन्सारी याच्यासह मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत चार गुन्हे केल्याची त्याने कबुली दिली आहे. त्याच्याकडून सोने, चांदिचे कॉईन, आठ हजार रूपयांची रोकड, एक मोबाईलचा इयरफोन असा ५९ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. दावडी येथील घरफोडी प्रकरणात राहुल घाडगे या भंगार व्यावसायिकाला अटक केली असून त्याच्याकडून ६० हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्याच्याविरोधातही यापुर्वी ९ गुन्हे दाखल आहेत अशी माहिती मानपाडा पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरिक्षक विजय कादबाने यांनी प्रसिद्धी माध्यमांना दिली.
कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर परिसरात रस्त्यावर उभ्या असलेल्या रिक्षा चोरणाऱ्या दोन चोरट्यांना मानपाडा पोलीसांनी मोठ्या शिताफीने अटक केली. नासिर हुसेन, शाहरुख शहा अशी या चोरट्यांची नावे असल्याची माहिती पाेलीसांनी दिली. त्यांच्या विरोधात मानपाडा, बाजारपेठ, हिललाईन, महात्मा फुले, टिटवाळा, टिळक नगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. चोरी केलेल्या रिक्षा ते कागदपत्र गहाळ झाल्याचा बनाव रचत मिळेल त्या किंमतीत विकत होते. त्यांच्याकडून सात रिक्षा जप्त करण्यात आल्या आहेत. या दोघांनी आणखी काही रिक्षा चोरी केल्याचा संशय असून मानपाडा पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत.
मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या घरफोडीच्या प्रकरणात मानपाडा पोलीसांनी तपास करत भिवंडी येथे सापळा रचत घरफोडी करणाऱ्या आफताब मोमीन या सराईत चोरट्याला बेड्या ठोकल्या आहेत. आफताब विरोधात मानपाडा, नारपोली, भोईवाडा, निजामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून त्याच्याकडून आतापर्यंत साठ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने, मोबाईल, रोख रक्कम मानपाडा पोलीसांनी हस्तगत केली आहे. काही दिवसांपूर्वी मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका ६४ वर्ष महिलेची साेनसाखळी चाेरी झाली होती. मानपाडा पोलीसांनी स्वप्नील माधवानी उर्फ करकट्या बाबू याच्यासह त्याचे साथीदार कलीम हरून शेख उर्फ बंगाली बाबू, जावेद शेख, इरफान सिद्दीकी शेख या चार सराईत चोरट्यांना बेड्या ठोकल्या आहेत. या चोरट्यांविरोधात टिळक नगर, डोंबिवली, कळवा, चितळसर पोलीस ठाण्यात आठ गुन्हे दाखल आहेत. यांच्याकडून एक लाख वीस हजार रुपये किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिने हस्तगत करण्यात मानपाडा पोलीसांना यश आलंय.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत