BREAKING NEWS
latest

राष्ट्रीय स्वराज्य सेना महायुती धर्म पाळनार: ॲड.श्रीहरी बागल


विशेष प्रतिनिधि

पुणे येथे राष्ट्रीय स्वराज्य सेना राजकीय पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड.श्रीहरी बागल यांनी राम नवमी निमित्त देवाची आळंदी येथे माऊळी चे दर्शन घेऊन पदाधिकारी व कार्यकर्ता मेळावा घेऊन पत्रकार परिषद घेतली व पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेला संभ्रम दूर केला.पुणे येथे पत्रकार परिषद घेण्या आधी श्रीहरि बागल यांनी पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भा चा संपूर्ण दौरा करून महाविजय २०२४ साकार करण्यासाठी सर्वांना एकत्र करुन नियोजन बद्ध काम केले आहे.             यावेळी बागल साहेब म्हणाले कि राष्ट्रीय स्वराज्य सेना राजकीय पक्ष हा महायुतीचा घटक पक्ष असून महायुतीचा धर्म पाळणे आपले कर्तव्य आहे.व आपण महायुती चे उमेदवार भरघोस मतांनी विजयी करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत.

आपल्या पक्षामध्ये मोठ्या प्रमाणात मराठा समाज असल्याने काही नाराज लोकांनी राष्ट्रीय स्वराज्य सेना पक्ष लोकसभा २०२४ निवडणूक स्वबळावर लढणार असा संभ्रम निर्माण केला होता तो संभ्रम दुर करून पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश दीले आहेत. राज्यात अनेक ठिकाणी पक्षाकडे सक्षम उमेदवार असतानाही पक्षाने स्वतः निवडणूक न लढवता महायुतीचे  काम करून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब परत तिसऱ्या वेळेस हि पंतप्रधान होण्यासाठी मा श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब व मा श्री आमदार प्रसादजी लाड साहेब समन्वयक ( पक्ष व सरकार  ) यांच्या मार्गदर्शनाखाली महायुती चा महाविजय २०२४ साकार करण्यासाठी काम करणार आहे असे आश्वासन राष्ट्रीय स्वराज्य सेनाचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड.श्रीहरी बागल यांनी या वेळेस सर्वांना दिले आहे .

« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत