BREAKING NEWS
latest

भारतीय अंतराळवीर सुनिता विल्यम्स चा आणखी एक विक्रम..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांच्या नावावर आणखी एक विक्रम रचला गेला आहे. त्यांनी बुधवार दि. ५ जून रोजी अंतराळात तिसऱ्यांदा यशस्वी उड्डाण केलं. अंतराळात चाचणी मोहिमेवर नवीन अंतराळयान उडवणाऱ्या सुनिता विल्यम्स या पहिला महिला ठरल्या आहेत. ५८ वर्षांच्या सुनीता विल्यम्स यांनी ५ जून रोजी फ्लोरिडा येथील केप कॅनाव्हरल येथून नासाचे अंतराळवीर बॅरी बुच विल्मोर यांच्यासोबत बोइंगच्या स्टारलाइनर कॅप्सूलमधून उड्डाण केले. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर जाणाऱ्या पहिल्या सदस्य बनून सुनीता विल्यम्स यांनी नवा इतिहास रचला आहे.

बोईंग 'क्रू फ्लाइट टेस्ट'(सीएफटी) नावाचे हे मिशन नासाच्या कमर्शियल क्रू प्रोग्रामच्या रुपात सुरू करण्यात आले होते. इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर नियमित क्रू फ्लाइटसाठी स्टारलाइनर प्रमाणित करण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. जर हे मिशन यशस्वी ठरले तर अंतराळवीरांना कक्षेतील लॅबमध्ये घेऊन जाणे आणि तेथून आणणारे स्टारलाइनर हे स्पेस एक्सच्या क्रू ड्रॅगन नंतरचे दुसरे खासगी अवकाशयान ठरेल.

सुनीता विल्यम्स यांच्यासाठी हे उड्डाण त्यांच्या कारकिर्दीतील आणखी एक मैलाचा दगड ठरला आहे. यापूर्वी, सुनीता विल्यम्स यांनी २००६-२००७ आणि २०१२ मध्ये आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरील मोहिमेदरम्यान सर्वाधिक स्पेसवॉक (७) आणि स्पेसवॉक टाइम (५० तास, ४० मिनिटे) करण्याचा विक्रम रचला होता. उड्डाण केल्यानंतर स्टारलायनर कॅप्सूल हे सुमारे २६ तासांनंतर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाशी डॉक करण्याचा प्रयत्न करेल. त्यामध्ये सुनीता विल्यम्स, विल्मोर आणि ऑर्बिटिंग आउटपोस्टसाठी ५०० पौंडांपेक्षा अधिक कार्गो असतील.

एक आठवडा अंतराळात थांबतील

नासाच्या सांगण्यानुसार, सर्व काही ठीक असेल तर स्टारलायनर हे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर उतरेल. त्यानंतर सुनीता विल्यम्स आणि सहकारी बुच विल्मोर हे दोन्ही अंतराळवीर सुमारे एक आठवडा अंतराळात थांबतील. तेथेही ते त्यांचे अभियान सुरू ठेवतील, स्टारलायनर आणि त्याच्या उपप्रणालीची चाचणी या काळात घेण्यात येईल.

या मोहिमांमध्ये सहभागी होत्या सुनीता विल्यम्स

२०१२ साली आंतरराष्ट्रीय अंतराळ प्रवासादरम्यान स्थानकाच्या अंतराळाच ट्रायलथॉन पूर्ण करणाऱ्या सुनिता विल्यम्स या पहिल्या व्यक्ती ठरल्या. यूएस नेव्हल अकादमीमध्ये प्रशिक्षण घेतल्यानंतर १९८७ साली त्या यूएस नेव्हीमध्ये सामील झाल्या. १९९८ साली नासाद्वारे सुनिता यांची अंतराळवीर म्हणून निवड करण्यात आली होती. त्यानंतर २००६ साली मिशन १४/१५ मध्ये आणि २०१२ साली त्या अंतराळ मोहिमांमध्ये सुनिता विल्यम्स यांचा महत्वाचा सहभाग होता.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत