BREAKING NEWS
latest

'जे एम एफ' शिक्षण संस्था संचलित 'जन गण मन' इंग्लिश सेकंडरी शाळा आणि विद्यामंदिर च्या विद्यार्थ्यांचा शाळेमध्ये पुनःश्च आगमन सोहळा संपन्न..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबवली दि.१८ : शाळा सुरू होण्याच्या  हंगामात जून महिन्यातला शाळेचा पहिला दिवस हा सर्वांच्याच आनंदाचा आणि उत्सुकतेचा दिवस असतो. नवीन वर्ग, नवीन मित्र/मैत्रिणी, नवीन वह्या पुस्तके आणि त्याचा नवीन कोरा सुगंध ह्या सर्व गोष्टींचे अप्रूप म्हणजे शाळेचा पहिला दिवस. आपला पाल्य नवीन गणवेश परिधान करून नवीन दप्तर पाठीवर घेऊन शाळेत जाताना बघुन पालकांचा आनंदाने उर भरून येतो, कदाचित त्यांना त्यांचेही दिवस आठवत असतील.
दिनांक १८ जून रोजी 'जे एम एफ' शिक्षण संस्था संचलित 'जन गण मन' इंग्लिश सेकंडरी स्कूल आणि विद्यामंदिर ह्या दोन्ही शाळेचा सुरू होण्याचा पहिला दिवस होता. सर्व शिक्षक वर्ग उत्साहाने मुलांच्या स्वागतासाठी तयारीत होता. शिशुविहर ते दहावी पर्यंतचे सर्वच विद्यार्थी आपापल्या पालकांसोबत शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ येऊ लागली. सर्व शिक्षक वर्गांनी मुलांना व पालकांना तिलक लावून व पुष्पवर्षाव करून ढोल ताशांच्या गजरात त्यांचे प्रवेश दारातून शाळेच्या आवारात स्वागत केले. सर्व मुले आनंदाने उड्या मारत व कुतूहलाने होत असलेला स्वागत सोहळा बघत होती. प्रत्येक वर्ग शिक्षिकेने त्यांच्या मुलांना 'हासरा चेहरा' (स्मायली इमोजी) त्यांचा गणवेश वर लावून हसत खेळत  त्यांच्या हाताला धरून प्रांगणात आणले. शाळेचे प्रवेशद्वार फुगे, फुले लावून सजवले गेले होते. रेड कार्पेट वरून सर्व विद्यार्थी शिस्तबद्ध पद्धतीने शाळेच्या प्रांगणात आले. त्यानंतर शाळेची नियमित प्रार्थना घेण्यात आली.
संस्थेच्या सचिव माननीय डॉ. सौ प्रेरणा कोल्हे यांनी शिशुविहार च्या सर्व विद्यार्थ्यांना आलिंगन  देऊन 'तुमच्या ह्या छोट्या पावलांच्या आगमनाने पुन्हा एकदा आपली शाळा नाचून बागडून आनंदाने फुलून जाऊ दे' असे म्हणून छोट्या बालकांना त्यांनी चॉकलेट दिले. दोन महिन्यांच्या उन्हाळी सुट्टीनंतर परत पहिल्यासारखा तोच जल्लोष, तोच आवाज, ह्यामुळे 'जन गण मन' शाळा चे प्रांगण आणि इमारत दणाणून गेले.

संस्थेचे संस्थापक माननीय डॉ. राजकुमार कोल्हे यांनी देखील आगमन झालेल्या सर्व मुलांना  शाळेच्या पहिल्या दिवसाच्या शुभेच्छा दिल्या व 'तुमचा प्रवास हा थकवणारा आणि लांबचा असेल, परंतु आम्हाला खात्री आहे की तुम्ही शाळेत राजासारखे असाल. तुम्हाला खूप मजेदार आणि विलक्षण दिवसाच्या शुभेच्छा' देत सर्व मुलांचे स्वागत केले.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत