BREAKING NEWS
latest

देशी बनावटीचे पिस्टल (अग्नीशस्त्र) बाळगणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगाराला मानपाडा पोलीसांनी केली अटक..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली : दिनांक १८/०६/२०२४ रोजी मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोळवली परिसर येथे एक इसम बेकायदेशीर रित्या विनापरवाना पिस्टल (अग्नीशस्त्र) सोबत बाळगुन फिरत असल्याबाबत खात्रीशीर माहिती मानपाडा पोलिसांना मिळाल्याने त्याप्रमाणे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाने आरोपी अंकुश राजकुमार केशरवानी (वय: २५ वर्ष), धंदा: बेकार, राहणार: दिलीप निवास, रूम नं. ३०८, आयरे रोड येथील स्वामी स्कुल जवळ, दत्तनगर, डोंबिवली (पूर्व) ता. कल्याण यास सापळा लावून शिताफीने ताब्यात घेवून त्याच्याकडुन एक देशी बनावटीचे पिस्टल व सहा जिवंत काडतुसं तसेच दोन मोबाईल असा एकुण १,३८,०००/- रू. किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर आरोपी याने बेकायदेशीर रित्या विनापरवाना पिस्टल (अग्निशस्त्र) सोबत बाळगल्याने त्याच्या विरुद्ध  मानपाडा पोलीस स्टेशन गुरजि नं. ७८५/२०२४ शस्त्र अधिनियम कलम ३,२५ सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१), १३५ प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे. नमुद आरोपी याच्या विरुद्ध  डोंबिवली पोलीस स्टेशन येथे यापुर्वी ०१ गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल आहे.
सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, दत्तात्रय शिंदे, मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ-३ कल्याण सचिन गुंजाळ, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त डोबिवली विभाग सुनिल कुराडे यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने, पोलीस निरीक्षक (गुन्हे) राम चोपडे, पोलीस निरीक्षक (प्रशासन) दत्तात्रय गुंड, पोलीस निरीक्षक (का.व सु) राहुल मस्के, सपोनि. महेश राळेभात, संपत फडोळ, प्रशांत आंधळे, सपोउनि. भानुदास काटकर, पोहवा. राजेंद्र खिलारे, दिपक गडगे, शिरीष पाटील, सुनिल पवार, संजु मासाळ, विकास माळी, पोना. यल्लापा पाटील, महादेव पवार, अनिल घुगे, शांताराम कसबे, रवि हासे, गणेश भोईर, प्रविण किनरे, अशोक आहेर, पोशि. महेंद्र मंझा, विजय आव्हाड, नाना चव्हाण, गणेश बडे यांच्या पथकाने केलेली आहे.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत