BREAKING NEWS
latest

डोंबिवलीत ४ जूनला मतमोजणीच्या दिवशी वाहतुकीत बदल..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली : येत्या ४ जून रोजी लोकसभा निवडणुकीची मतमोजणी होणार आहे. कल्याण लोकसभेची मतमोजणी डोंबिवलीच्या वै.ह.भ.प. सावळाराम महाराज क्रिडा संकुल परिसरात होणार आहे. या पार्श्वभमीवर ४ जून २०२४ रोजी डोंबिवलीतील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले असून पहाटे ५ वाजल्यापासून रात्री ८ वाजेपर्यंत हे बदल राहतील अशी माहिती वाहतूक विभागातर्फे प्रसिद्धी माध्यमांना देण्यात आली आहे. 

असे आहेत हे डोंबिवलीतील वाहतूक बदल..

प्रवेश बंद - १)
डोंबिवली स्टेशन, चार रस्ता, टिळक चौक, शेलार नाका मार्गे घरडा सर्कलकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना शिवम हॉस्पिटल, डोंबिवली पूर्व येथे 'प्रवेश बंद' करण्यात येत आहे.

पर्यायी मार्ग
ही वाहने शिवम हॉस्पिटल येवून उजवीकडे वळून जिमखाना रोड, सागर्ली मार्गे इच्छित स्थळी जातील.

प्रवेश बंद - २) 
सुयोग रिजन्सी अनंतम, पेंढारकर कॉलेज मार्गे घरडा सर्कलकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना आर. आर. हॉस्पिटल, डोंबिवली पूर्व येथे 'प्रवेश बंद' करण्यात येत आहे.

पर्यायी मार्ग
ही वाहने आर. आर. हॉस्पिटल येथून डावीकडे वळून कावेरी चौक, एम.आय.डी.सी. मार्गे इच्छित स्थळी जातील.

प्रवेश बंद - ३)
खंबाळपाडा रोड, ९० फुट रस्ता, ठाकुर्ली रोडकडून घारडा सर्कलकडे तसेच विको नाकाकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना बंदिश पॅलेस हॉटेल येथे 'प्रवेश बंद' करण्यात येत आहे.

पर्यायी मार्ग
खंबाळपाडा रोड, ९० फुट रस्ता, ठाकुर्ली रोड कडून येणारी वाहने खंबाळपाडा रोड टाटा नाका मार्गे इच्छित स्थळी जातील.

प्रवेश बंद - ४) 
आजदे गाव आणि आजदे पाडा कमान येथून घरडा सर्कल मार्गे बंदिश पॅलेस हॉटेलकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना घरडा सर्कल येथे 'प्रवेश बंद' करण्यात येत आहे.

पर्यायी मार्ग
आजदेगाव आणि आजदे पाडा कमान येथून बाहेर पडणारी वाहने डावीकडे वळून शिवम हॉस्पिटलमार्गे इच्छित स्थळी जातील,

प्रवेश बंद - ५)
विको नाका कडून बंदिश पॅलेस हॉटेलकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना हॉटेल मनिष गार्डन येथे 'प्रवेश बंद' करण्यात येत आहे.

पर्यायी मार्ग
विको नाकाकडून येणारी वाहने हॉटेल मनिष गार्डन येथून उजवीकडे वळून इच्छित स्थळी जातील. 

ही अधिसूचना दि. ०४/०६/२०२४ रोजी सकाळी ०५:०० ते रात्रौ २०:०० वाजेपावेतो अंमलात राहणार असून ही वाहतूक नियंत्रण अधिसूचना पोलीस वाहने, फायर ब्रिगेड, रुग्णवाहिका, ग्रीन कॉरीडोर, ऑक्सिजन गॅस वाहने आणि इतर अत्यावश्यक सेवेतील वाहनांना लागू राहणार नाही.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत