BREAKING NEWS
latest

२४-कल्याण लोकसभा मतदार संघातील यंत्रणा मतमोजणीसाठी सज्ज..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

कल्याण दि.३० मे : २४-कल्याण लोकसभा मतदार संघातील यंत्रणा मतमोजणीसाठी सज्ज असल्याची माहिती २४-कल्याण लोकसभा मतदार संघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी सुषमा सातपुते यांनी प्रसिद्धी माध्यमांना दिली आहे. दि. २० मे २०२४ रोजी संपन्न झालेल्या मतदान प्रक्रियेच्या २४-कल्याण लोकसभा मतदार संघातील मतमोजणीस डोंबिवली पूर्वेतील एमआयडीसीतील वै.ह.भ.प.सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुलातील कै.सुरेंद्र वाजपेयी बंदीस्त क्रीडागृहात दि. ०४ जून २०२४ रोजी सकाळी ८ पासून प्रारंभ होणार आहे. 
या मतमोजणीसाठी अधिकारी व कर्मचारी वर्गाचे पहिले प्रशिक्षण शिबीर दि. २८ मे २०२४ रोजी डोंबिवली (पूर्व) येथील सावित्रीबाई फुले कलामंदिरात संपन्न झाले. आता मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी व कर्मचारी यांचे दुसरे प्रशिक्षण शिबीर (रंगीत तालीम) दि. ०३ जून २०२४ रोजी सकाळी ०६.०० वाजता डोंबिवली पूर्वेतील वै.ह.भ.प.सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुलातील कै.सुरेंद्र वाजपेयी बंदीस्त क्रीडागृहात ठेवण्यात आले आहे. 

मतमोजणीच्या दिवशी मतमोजणी केंद्रात प्रती विधानसभा मतदार संघात १४ याप्रमाणे एकूण ८४ टेबल्सवर मतमोजणी करण्यात येणार असून, मतमोजणीच्या एकूण २९ फेऱ्या होणार आहेत. या मतमोजणी कामी एकूण ६०० अधिकारी व कर्मचारी (पोलीस स्टाफ वगळून) वर्गाची नियुक्ती करण्यात आली आहे.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत