BREAKING NEWS
latest

आरटीई प्रवेशासाठी ४ जूनपर्यत मुदतवाढ - शिक्षणाधिकारी बाळासाहेब राक्षे

प्रतिनिधी: अवधूत सावंत

ठाणे, दि. ०१ : आरटीई २५% टक्के प्रवेश प्रक्रीया ऑनलाईन पद्धतीने दिनांक १७ मे पासून सुरु करण्यात आलेली आहे. आरटीई प्रवेशासाठी ०४ जून पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून पालकांनी विद्यार्थ्यांसाठी या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन शिक्षणाधिकारी (प्राथमिक) बाळासाहेब राक्षे यांनी केले आहे.  

ठाणे जिल्ह्यात ३१ मेपर्यंत ११ हजार ३७७ जागासाठी १८ हजार ८०७ अर्ज प्राप्त झाले आहेत. प्रवेश प्रक्रियेच्या कामकाजासाठी गठित केलेल्या पडताळणी समितीने प्रवेश पात्र बालकांचे प्रवेशाकरिता आवश्यक त्या सर्व कागदपत्रांची पडताळणी करण्यात येणार असल्याने पडताळणी समितीस पुरेसा वेळ देणे आवश्यक असल्याने ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्यासाठी ४ जून पर्यंत देण्यात आलेल्या मुदतीत पालकांनी अर्ज भरणे आवश्यक आहे. ४ जून नंतर मुदतवाढ देण्यात येणार नाही.  

सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षाकरिता आरटीई २५% ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेंतर्गत सर्व पंचायत समिती व महानगर पालिका मध्ये एकूण ६४२ पात्र शाळा असून एकूण ११ हजार ३७७ रिक्त जागा उपलब्ध आहेत. तरी पालकांना ऑनलाईन प्रवेश अर्ज मुदतीपूर्वी भरण्याची काळजी घ्यावी व पालकांनी आरटीई पोर्टलवर सूचनांचे वेळोवेळी अवलोकन करावे असे आवाहन शिक्षणाधिकारी (प्राथमिक) बाळासाहेब राक्षे यांनी केले आहे.

श्रीम. रेश्मा सावित्री गंगाराम आरोटे (जनसंपर्क अधिकारी, जिल्हा परिषद ठाणे)
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत