BREAKING NEWS
latest

डायघर पोलीस स्टेशन हद्दीतील २ घरफोड्या व १ मोटारसायकल चोरीचे गूढ उकलण्यात कल्याण गुन्हे शाखा घटक-३ च्या पोलीसांना यश..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली दि.२५: गुन्हे शाखा, घटक-३, कल्याण च्या घटकातील पोना. सचिन वानखेडे यांना त्यांच्या बातमीदारामार्फत दि. २५/०६/२०२४ रोजी  मिळालेल्या बातमीवरून मानपाडा माणगाव नाका, कल्याण-शिळ रोड, डोंबिवली (पुर्व) याठिकाणी सापळा रचुन संशयीत बाल अपराधी गणेश सुरेश भारद्वाज (वय: १७ वर्ष) रा. अर्जुन हाईटस् बिल्डिंग, रूम नं ७०२, वैभव नगरीसमोर, काटई, डोंबिवली (पुर्व) यास १४.१० वा. ताब्यात घेवुन त्याच्या  अंगझडतीत सोन्याचे दागिने सापडल्याने त्याबाबत त्याची कसून चौकशी करून गुन्हे अभिलेखाची पडताळणी करता ते डायघर पोलीस ठाणे गु.रजि.नंबर २४१/२०२३ भादंवि कलम ३८०, ४५४, गु.रजि.नंबर २८०/२०२३ भादंवि कलम ३८०, ४५४ या गुन्ह्यातील डायघर पोलीस ठाणे येथे नोंद असलेल्या गुन्ह्यातील चोरीस गेलेले सोन्याचे दागिने असल्याचे निष्पन्न झाले. तसेच त्याच्या ताब्यात मानपाडा पोलीस ठाणे गु.रजि.नंबर ८०६/२०२४ भा.द.वि. कलम ३७९ या गुन्ह्यातील एक हिरो स्प्लेंडर प्लस मोटार सायकल सापडली आहे. असा त्याच्या ताब्यातुन एकुण ४,२५,०००/- रू. किंमतीचे एकुन १२ तोळे ५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व हिरो स्प्लेंडर प्लस  मोटार सायकल असा मुदद्दे‌माल पंननामा करून हस्तगत करण्यात आला आहे. त्यांचे वर्णन पुढील प्रमाणे आहे - 
१) २,१०,०००/- रु. किंमतीचे एक ७ तोळे वजनाचे पट्ट्यांची डिजाईन असलेले सोन्याचे गंठण,
२) ७,५०० रु. किंमतीचे एक २ ग्रॅम ५ मि.ली.ग्रॅम वजनाची लेडिज सोन्याची अंगठी,
३) ७,५००/- रु. किंमतीचे एक २ ग्रॅम ५ मि.ली.ग्रॅम वजनाची जेन्टस् सोन्याची अंगठी,
४) १,३५,०००/- रु. किंमतीचे एक ४ तोळे ५ ग्रॅम वजनाचे काळे व सोन्याचे मणी असलेले सोन्याचे गंठण,
५) ७,५००/- रु. किंमतीचे एक २ ग्रॅम ५ मि.ली. ग्रॅम वजनाची लेडिज सोन्याची अंगठी,
६) ७,५००/- रु. किंमतीचे एक २ ग्रॅम ५ मि.ली. ग्रॅम वजनाची लेडिज सोन्याची अंगठी,
७) ५०,०००/- रु. किंमतीची एक हिरो स्प्लेंडर प्लस मोटार सायकल क्रमांक एमएच-०५ /एवाय ८८४३ (मूळ क्रमांक एमएच-०५ / ईएन ३९८०) ज्याची एकूण किंमत ४,२५,०००/- आहे.

त्या करिता विधीसंघर्षीत बालअपराधी गणेश सुरेश भारव्दाज यांस पुढील कायदेशीर कारवाईकामी ताब्यात घेण्यात आले आहे. त्यास ताब्यात घेतल्याबाबत त्याची आई प्रभावती सुरेश भारद्वाज ह्यांना  संपर्क साधुन कळविण्यात आले आहे. तरी संशयीत विधीसंघर्षीत बाल अपराधी यास म.पो.हवा ज्योत्सना कुंभारे ह्यांच्या ताब्यात देवुन पाठविण्यात आले असुन पुढील योग्य ती कायदेशिर कारवाई करण्यात येत आहे.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत