BREAKING NEWS
latest

खंडणी विरोधी पथकाने ०३ आरोपीना अटक करून १८,९०,०००/- रूपये किंमतीचा १ किलो ८९० ग्रॅम वजनाचा चरस हा अंमली पदार्थ केला जप्त..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

ठाणे :  एक संशयित इसम चरस हा अंमली पदार्थ विक्री करण्याकरीता टेमघर पाईपलाईन रोड लगत भिवंडी याठिकाणी दिनांक १४/०६/२०२४ रोजी १८.०० वाजताच्या सुमारास येणार असल्याबाबत खंडणी विरोधी पथकास गुप्त बातमी प्राप्त झाली होती. सदर बातमीचे अनुषंगाने खंडणी विरोधी पथकातील अधिकारी व कर्मचारी यांनी सापळा रचला असता यातील आरोपी अनिलकुमार श्रीमुखलाल प्रजापती (वय: ४२ वर्षे), धंदा: मॅकेनिक, राहणार. सचिन शेठ चाळ, रूम नंबर ३, रामु नगर, पाईप लाईन रोड, भिवंडी, जि. ठाणे, मुळ रा. गाव दुसौती, पोस्ट सैदाबाद, तहसिल हंडीया, जि. प्रयागराज, राज्य उत्तरप्रदेश यास १७,२०,०००/- रू. किंमतीचा १ किलो ७२० ग्रॅम वजनाचा चरस या अंमली पदार्थासह ताब्यात घेण्यात आलेले आहे. याबाबत शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नंबर १२८९/२०२४ एनडीपीएस कायदा कलम ८(क), २०(ब), ॥ (क), २९ प्रमाणे दिनांक १४/०६/२०२४ रोजी ०४.०५ वाजता दाखल करण्यात आलेला आहे. 
                                      
सदर गुन्ह्यातील आरोपी अनिलकुमार श्रीमुखलाल प्रजापती यास चरस हा अंमली पदार्थ विक्री करणारा इसम अर्जुनकुमार जोखुलाल प्रजापती, (वय: ३८ वर्षे), रा. गाव बिरगापुर, पोस्ट हनुमानगंज, तहसिल फुलपुर, जि. प्रयागराज, राज्य उत्तरप्रदेश यास प्रयागराज, उत्तरप्रदेश येथे तपास पथक पाठवुन त्यास ताब्यात घेवुन दिनांक २०/०६/२०२४ रोजी अटक करण्यात आलेली आहे.

तसेच गुन्ह्यातील आरोपी अर्जुनकुमार जोखुलाल प्रजापती याने चारस हा अंमली पदार्थ विक्री केलेला इसम नामे श्यामबाबु प्रल्हाद सरोज (वय: ५१ वर्षे), धंदा: रिक्षा चालक, रा. ई-१, ३५ सी ३, सेक्टर ८, नेरूळ नवी मुंबई मुळ राहणार गाव बेलहा सिंगमऊ, तहसिल हंडीया, जिल्हा प्रयागराज, राज्य उत्तरप्रदेश यास नेरूळ नवीमुंबई येथे तपास पथक पाठवुन त्यास दिनांक २१/०६/२०२४ रोजी अटक करण्यात आलेली आहे. यातील आरोपी श्यामबाबु प्रल्हाद सरोज याची दिनांक २४/०६/२०२४ रोजी घरझडती घेतली असता त्याच्या घरामध्ये १,७०,०००/- रू किंमतीचा १७० ग्रॅम वजनाचा चरस हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आलेला आहे. याप्रमाणे सदर गुन्ह्यात  खंडणी विरोधी पथकातील अधिकारी व कर्मचारी यांनी एकुण ३ आरोपींना अटक करून त्यांच्याकडुन १८,९०,०००/- रूपये किंमतीचा १ किलो ८९० ग्रॅम वजनाचा चरस हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आलेला आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास सपोनि. सुनिल तारमळे नेमणूक खंडणी विरोधी पथक, गुन्हे शाखा, ठाणे शहर हे करीत आहे.

सदर गुन्हयातील अटक केलेला मुख्य आरोपी अर्जुनकुमार जोखुलाल प्रजापती याचे विरूध्द खालील प्रमाणे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.

१. कैण्ट पोलीस स्टेशन, प्रयागराज राज्य:उत्तरप्रदेश, गुरनं १६६/२००९ एनडीपीएस कायदा कलम ८, २०
२. कैण्ट पोलीस स्टेशन, प्रयागराज राज्य:उत्तरप्रदेश, गुरनं १८७/२००९ युपी गैग ऍक्ट कलम २, ३
३. हंडीया पोलीस स्टेशन, प्रयागराज, राज्य:उत्तरप्रदेश गुरनं ४६/२०१४ भादंवि कलम १४७, ३२३, ३६४,      ४५२, ५०४, ५०६, एससी/एसटी कायदा कलम ३(१) ५
४. शांतीनगर पोलीस स्टेशन, ठाणे शहर गुरनं ३००१/२०१४ भारतीय हत्यार कायदा कलम ३, २५ सह मपोका ३७(१), १३५
सदरची कारवाई मा. आशुतोष डुंबरे, पोलीस आयुक्त, ठाणे शहर, मा. डॉ.ज्ञानेश्वर चव्हाण, पोलीस सह आयुक्त, ठाणे शहर, मा. डॉ. पंजाबराव उगले, अपर पोलीस आयुक्त, (गुन्हे), ठाणे शहर, मा. शिवराज पाटील, पोलीस उप आयुक्त, (गुन्हे), ठाणे, मा. राजकुमार डोंगरे, सहायक पोलीस आयुक्त, शोध-२. गुन्हे शाखा, ठाण, मा. शेखर बागडे, सहाय्यक पोलीस आयुक्त, विशेष कृती दल ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली मालोजी शिंदे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, खंडणी विरोधी पथक, ठाणे, मपोनि. वनिता पाटील, सपोनि. सुनिल तारमळे, भुषण कापडनिस, श्रीकृष्ण गोरे, पोउपनिरी. विजयकुमार राठोड, सपोउपनि. सुभाष तावडे, कल्याण ढोकणे, पोहवा. आशिष ठाकुर, संजय राठोड, सचिन शिंपी, गणेश गुरसाळी, संदीप भोसले,  योगीराज कानडे, निलेश जाधव, मपोहवा. शितल पावसकर, चापोन. भगवान हिवरे, पोशि. तानाजी पाटील, अरविंद शेजवळ, मपोशि/मयुरी भोसले, पोशि. ढाकणे, चामपोशि. शार्दुल यांनी यशस्वीरीत्या केली आहे.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत