कल्याण : पावसाळ्याच्या आपत्कालीन परिस्थितीत नागरीकांच्या सोयीसाठी त्यांच्या अडचणी शक्यतो प्रभागस्तरावर सोडविण्यात याव्यात, असे निर्देश कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड़ यांनी दिली असल्याची माहिती आपत्कालीन विभागाचे उपायुक्त धैर्यशील जाधव यांनी दिली आहे. आज पावसाळ्यातील आपत्कालीन परिस्थितीबाबत महापालिकेचे सर्व सहाय्यक आयुक्त, स्वच्छता अधिकारी यांचे समवेत आपत्कालीन नियंत्रण विभागाचे उपायुक्त धैर्यशील जाधव यांनी दूरदृष्य प्रणालीद्वारे संपर्क साधून सर्व प्रभाग अधिकारी यांस आपत्कालीन परिस्थितीत सतर्क राहून घ्यावयाच्या दक्षतेबाबत सूचना दिल्या.
कल्याण-डोंविबली परिसरात सकाळपासून मूसळधार पर्जन्यवृष्टी झाली. अशा वेळी सखल भागातील पाण्याचा चोकअप पॉईंट वरुन निचरा होण्यासाठी त्वरीत एसओपी तयार करुन त्यानुसार अंमलबजावणी करावी, असे निर्देश देण्यात आले. आपत्कालीन परिस्थितीसाठी वाढीव मनुष्यबळ तसेच सर्व प्रभागांसाठी मिळून ५ जेसीबी व ५ डंपर देण्यात आले आहेत.
धोकादायक झाडे पडून काही हानी होवू नये म्हणून वृक्ष आणि प्राधिकरण विभागाने समन्वय अधिकाऱ्याची नियुक्ती करावी, अशा सूचना देण्यात आल्या. पावसाळी आपत्कालीन परिस्थितीत समन्वय साधण्यासाठी महापालिकेची वॉकी-टॉकी यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे.
महानगरपालिकेने आपत्कालीन परिस्थितीत नागरीकांच्या सोयीसुविधांसाठी १८००२३३७३८३ आणि १८००२३३४३९२ हे टोल-फ्री संपर्क क्रमांक जाहीर करण्यांत येत असल्याची माहिती आपत्कालीन नियंत्रण विभागाचे उपायुक्त धैर्यशील जाधव यांनी प्रसिद्धी माध्यमांना दिली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा