BREAKING NEWS
latest

१० व्या इंडो-नेपाल आंतरराष्ट्रीय योगासन स्पर्धेत डोंबिवलीच्या मीना घनवट आणि राधिका केतकर यांनी पटकाविले सुवर्णपदक..

                         
प्रतिनिधी: अवधुत सावंत


डोंबिवली : नुकत्याच दिनांक २९ जून २०२४ रोजी नेपाळची राजधानी, काठमांडू येथील 'बोगनविला हॉल' मध्ये झालेल्या १० व्या 'इंडो - नेपाल आंतरराष्ट्रीय योगासन स्पर्धा २०२४'  मध्ये डोंबिवलीकर असलेल्या ४८ वर्षीय सौ.मीना घनवट यांनी ४० ते ५० वयोगटात तर ६३ वर्षीय सौ.राधिका श्रीकृष्ण केतकर यांनी ५० ते ६५ वयोगटातील स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवत  सुवर्णपदक पटकाविले. ही स्पर्धा पारंपारिक योगासन, रिदमीक एकेरी व दुहेरी अश्या प्रकारात घेण्यात आली होती.
                                 
                                  
                                  
स्पर्धेचे उद्घाटन हे 'नेपाळ ऑलीम्पिक असोसिएशन' चे वरिष्ठ उपाध्यक्ष श्री.राजेश श्रेष्ठ यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी इंडो - नेपाळ योगासन स्पर्धेचे को-ऑर्डीनेटर श्री.सुरेश गांधी, नेपाल योगा कलचर असोसिएशनचे सचिव श्री.संतोष श्रेष्ठ, नेपाळ योग् विद्या प्रमुख सौ.सुषमा पोडेल मॅडम, तांत्रिक समिती प्रमुख ज्योत्स्ना रायरीकर, पंच प्रमुख सौ.अभिश्री राजपूत व वैशाली मिटकरी, आंतरराष्ट्रीय पंच सौ.अल्पना पांडे व सौ.शोभा पाटील यांची उपस्थिती होती.