डोंबिवली : सन २०१९ ला कनिष्ठ महाविद्यालयीन 'मराठी विषय शिक्षक महासंघ' या नावाने संघटनेची अधिकृत नोंदणी करण्यात आली. महाराष्ट्रात कनिष्ठ महाविद्यालय विषय स्तरावर मराठी विषय शिक्षकांची ही सर्वांत मोठी एकमेव संघटना आहे. मराठी भाषेचे संवर्धन करणे, मराठी भाषा विषय शिक्षकांच्या समस्या सोडविणे, अध्ययन अध्यापनातील येणाऱ्या अडचणींचे शंका निरसन करणे आणि महाराष्ट्रात मराठी भाषा विषय इयत्ता बारावी पर्यंत सक्तीचा होण्यासाठी शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा करणे ही महासंघाची भूमिका आहे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी ही संघटना नेहमीच अग्रेसर आहे. महासंघाच्या घटनेप्रमाणे दर तीन वर्षांनी राज्य कार्यकारिणीची निवड करून कार्यकारिणी घोषित करण्यात येते. प्रत्येक वेळी नवीन इच्छुक व अभ्यासू शिक्षकांना सहभागी करून प्रतिनिधीत्व करण्याची संधी दिली जाते.
सन २०२४ ते २०२७ या तीन वर्षाच्या कालावधीसाठी कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षक महासंघाची नवीन ठाणे जिल्हा कार्यकारिणी घोषित करण्यात आली. यात अध्यक्ष प्रा. मंजिरी गजरे, उपाध्यक्ष एकनाथ रामभाऊ चौधरी, उपाध्यक्ष प्रा. मनिषा राजपूत, कार्याध्यक्ष प्रा. अर्जुन उगलमुगले, सचिव प्रा. पंकज देसले, खजिनदार प्रा. अशोक मुंडावरे, प्रा. महेश कुलसंगे, समन्वयक प्रा. जयवंत बांगर, प्रा. नयन म्हारनूर, सहसचिव प्रा. एकनाथ पांढरे, प्रा. हरेश्वर भोये, सल्लागार सदस्य प्रा. दिलीप कुमावत, प्रा. शशिकांत सोनार, प्रा. नंदकुमार वाकचौरे, प्रा. प्रशांत मोरे, प्रा. रवींद्र पवार, डॉ. तृप्ती सोनावणे, तर तालुका प्रतिनिधी म्हणून प्रा. महेश कुलसंगे (ठाणे शहराध्यक्ष), प्रा. कविता भागवत (कल्याण), प्रा. अरुण गोंधळी (मुरबाड), प्रा. शिल्पा जळकोटे (उल्हासनगर), प्रा. ज्योती लिपारे (अंबरनाथ), प्रा. दिगंबर खरात (भिवंडी), प्रा. दिगंबर खरात (शहापूर) अशा प्रकारे कनिष्ठ महाविद्यालय मराठी विषय शिक्षक महासंघाची नवीन ठाणे जिल्हा कार्यकारिणी निश्चित झालेली आहे.
मा. राज्याध्यक्ष प्रा. सुनील डिसले, मा. सचिव प्रा. बाळासाहेब माने, मा. कार्याध्यक्ष डॉ. मनीषा रिठे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे जिल्हा कार्यकारिणी काम पहाणार आहे. मराठी विषय शिक्षकांचा कार्यभार कायम रहावा तसेच मराठी विषय शिक्षकांच्या समस्या सोडवल्या जाव्यात यासाठी ही जिल्हा कार्यकारिणी कटिबद्ध आहे. मराठी भाषेविषयी शासनाचे धोरण उदासीन असून, त्यासाठी संघटीत लढा देण्याची गरज आहे. यासाठीच नवीन कार्यकारिणी मराठी भाषा विषय शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेईल, तसेच ठाणे जिल्ह्यातील सर्व माध्यमाच्या कनिष्ठ महाविद्यालीयन मराठी विषय शिक्षकांनी या संघटनेमध्ये समाविष्ट व्हावे असे आवाहन ठाणे जिल्हाध्यक्ष प्रा. मंजिरी गजरे यांनी केले आहे. नवनियुक्त ठाणे जिल्हा कार्यकारिणीचे सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा