डोंबिवली : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याप्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजेश मोरे या सामान्य कार्यकर्त्याला विधानसभा निवडणुकीची संधी दिली असून २४ तास उपलब्ध असणाऱ्या आणि सुख दुःखात धावून येणाऱ्या राजेश मोरे यांच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला निवडून देण्यासाठी झटून काम करण्याचे आवाहन कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आज राजेश मोरे यांच्या मध्यवर्ती कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी केले आहे. कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील
शिवसेना भाजप राष्ट्रवादी आणि आर पी आय महायुतीचे उमेदवार राजेश मोरे यांच्या मध्यवर्ती निवडणूक प्रचार कार्यालयाचे उद्घाटन आज खासदर डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या प्रमूख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी पुरोहितांनी केलेल्या मंत्रोच्चारामुळे इथले वातावरण अधिकच मंगलमय झाले होते.
राजा का बेटा राजा नही बनेगा - खासदर डॉ.श्रीकांत शिंदे
आपल्या पक्षामध्ये राजेश मोरे यांना संधी दिल्याने सामान्य कार्यकर्त्यामध्ये ऊर्जा आणि आनंदाचे वातावरण आहे. तर राजा का बेटा राजा नही बनेगा, यानुसार सगळीकडे कार्यकर्त्याला संधी देण्यात आली आहे. आपण सगळ्यांना एकत्रित घेऊन विकास करण्याचे काम करतोय, महायुतीचे सगळे कार्यकर्ते कामाला लागले असून यावेळेस कल्याण लोकसभा मतदारसंघांतील महायुतीच्या जागा १०० टक्के निवडून येणार असल्याचा विश्वास खासदार डॉ. शिंदे यांनी यावेळी उद्घाटन प्रसंगी बोलताना व्यक्त केला.
२४ तास उपलब्ध असणारा आमदार पाहिजे
तर राजेश मोरे यांना भेटायला कोणत्याही अपॉइंटमेंटची गरज भासत नाही. आमदार म्हणून निवडून आल्यावरही त्यांची अशीच कार्यपद्धती राहणार असून आपल्याला २४ तास उपलब्ध असणारा आणि आपल्या सुख दुःखात धावून येणारा लोकप्रतिनिधी पाहिजे असल्याचे मत खासदर डॉ.श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त करत राजेश मोरे यांना बहुमताने विजयी करण्यासाठी सगळ्यांनी मेहनत घेण्याची गरज व्यक्त केली.
कल्याण ग्रामीणचा गड परत मिळवायचा आहे - राजेश मोरे
यावेळी उपस्थित महायुतीच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधताना महायुती अधिकृत उमेदवार राजेश मोरे यांनी सांगितले की आपल्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यावर विश्वास ठेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी उमेदवारी दिली आहे. हा कल्याण ग्रामीणचा गड दोन वेळा आपल्या हातून गेला असला तरी तो परत मिळवायचा आहे. मेहनत करा, लोकसभेला खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी जशी रात्रंदिवस मेहनत घेतली, तशाचप्रकारे आपल्याला मेहनत करावी लागेल असे आवाहन राजेश मोरे यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना केले.
महायुतीचे उमेदवार राजेश मोरे यांच्या मध्यवर्ती निवडणूक कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, भाजप जिल्हाध्यक्ष नाना सुर्यवंशी, आरपीआय जिल्हाध्यक्ष प्रल्हाद जाधव, उपजिल्हाप्रमुख राजेश कदम, रवी मट्या पाटील, जितेन पाटील, भाजप कल्याण ग्रामीणचे महेश पाटील, माजी उप-महापौर मोरेश्वर भोईर, राष्ट्रवादी काँग्रेसचे ऍड. ब्रह्मा माळी, महिला आघाडीच्या प्रमुख लताताई पाटील, माजी नगरसेवक जालिंदर पाटील, अर्जुन पाटील, रमाकांत पाटील, २७ गाव संघर्ष समितीचे गुलाब वझे, कल्याण ग्रामीणचे नंदू परब, शैलेश पाटील, यांच्यासह शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी रिपाइंचे सर्व पदाधिकारी आणि महिला आघाडीच्या प्रमुख आणि सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा