नागपूर : महाराष्ट्राची उप राजधानी नागपूर येथील दावसा येथील 'जे एम एफ' शिक्षण संस्था अंतर्गत जन गण मन कॉन्व्हेन्ट शाळा येथे दरवर्षी प्रमाणेच मुलांच्या सुप्त गुणांना प्रोत्साहन देण्यासाठी यावर्षी देखील वार्षिक स्नेह संमेलन आयोजित करण्यात आले होते. सकाळी अकरा ते तीन च्या सत्रात शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या अंतर्भूत असलेल्या कलेची चुणूक दाखवून सर्व उपस्थित पालकांचे तसेच पाहुण्यांचे मन जिंकले. 'जे एम एफ' शिक्षण संस्थेचे संस्थापक सर्वेसर्वा माननीय डॉ. राजकुमार कोल्हे, सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे , खजिनदार जान्हवी कोल्हे, नागपूर शाळेतील निवृत्त मुख्याध्यपक श्री.परशुराम जी भांगे, त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. पुष्पा भांगे, दावसा गावचे प्रतिष्ठित डॉकटर व डॉ.राजकुमार कोल्हे यांचे पिताश्री डॉ. मारोत राव कोल्हे, व्यवस्थापक श्री. महेश कळंबे, मुख्याध्यापक श्री. भजन सर, तसेच मुंबई मधील शाळा महाविद्यालयाचे प्राचार्य श्री.अमोद वैद्य, श्री.अल्पेष खोब्रागडे सर्व शिक्षक व इतर पदाधिकारी यांच्या हस्ते सरस्वती पूजन करण्यात आले. सर्व मान्यवरांचे नैसर्गिक पान फुलांनी तयार केलेले पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले तर विद्यार्थ्यांनी स्वागत गीत गायन केले. संवादिनी साथ मुंबईच्या संगीत शिक्षिका सौ.श्रेया कुलकर्णी यांनी केली.
Responsive Adsense
'जन गण मन' इंग्लिश (कॉन्व्हेन्ट) शाळेमध्ये रंगला वार्षिक स्नेहसंमेलनचा दिमाखदार सोहळा व मोफत आरोग्य तपासणी शिबिर..
avdhoot13
-
जानेवारी ०२, २०२५
Edit this post