कल्याण दि.०८: महाराष्ट्र पोलीस दलाचे स्थापनेचे औचित्य साधुन दिनांक ०२ जानेवारी ते ०८ जानेवारी २०२५ दरम्यान 'पोलीस रेझिंग डे सप्ताह' साजरा करण्यात येत आहे. त्याअनुषंगाने दिनांक ०८/०१/२०२५ रोजी १६.०० ते १९.०० वाजेच्या दरम्यान बाजारपेठ पोलीस ठाणे हद्दीतील साई नंदन हॉल, कृषी उत्पन्न बाजार समिती, वल्लीपीर रोड, कल्याण पश्चिम येथे ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाचे वतीने परिमंडळ-३, कल्याण अंतर्गत "मुददेमाल हस्तांतरण व सीएमआयएस ऍप चे अनावरण" या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कल्याण पोलीस परिमंडळ-३ क्षेत्रात येणाऱ्या महात्मा फुले चौक, बाजारपेठ, कोळशेवाडी, खडकपाडा, डोंबिवली, विष्णूनगर, मानपाडा, टिळकनगर पोलीस ठाण्याअंतर्गत चोरीला गेलेला एकूण १६२ लोकांना रुपये १,४३,३७,८१०/- असा सुमारे दीड कोटीचा मुद्देमाल फिर्यादींना परत करण्यात आला. त्यात रुपये ६४,९५,८१०/- सोन्याचांदीचे दागिने, रुपये ४९,७१,०००/- वाहने, रुपये १५,९३,०००/- मोबाईल, रुपये १२,७८,०००/- रोख रक्कम असा तपशील असून नागरिकांकडून पोलीसांचे आभार व्यक्त केले जात आहे. तसेच पत्रकारांकडून देखील पोलीसांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल प्रसार माध्यमाद्वारे बातमी प्रसारित करण्यात येतात म्हणून उपस्थित पत्रकारांना पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. सदरचा कार्यक्रम शांततेत पार पडला असून कार्यक्रमाचे ठिकाणी ५०० ते ५३० जनसमुदाय उपस्थित होता.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा