नवी दिल्ली, दि.०८ : दिल्लीच्या मतदारांनी अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीला नाकारत तब्बल सत्तावीस वर्षांनी कमळ फुलवलं आहे. तब्बल २७ वर्षांनी देशाच्या राजधानीत भाजपाची सत्ता आली आहे. ७० जागांपैकी भाजपानं ४८ जागा जिंकल्या आहेत.
तर दोन वेळा एकहाती मोठा विजय मिळवलेल्या आम आदमी पार्टी (आप) पक्षाला फक्त २२ जागा जिंकता आल्या आहेत. काँग्रेसला ह्या निवडणुकीत आपलं खातंही उघडता आलेलं नाही. भाजपाचे परवेश वर्मा यांनी अरविंद केजरीवाल यांचा ४००० मतांनी पराभव केला आहे तर माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया हे देखील पराभूत झाले आहेत. भाजपाच्या रेखा गुप्ता, कपिल मिश्रा, मणिंदर सिंग सिर्सा, तिलक राम गुप्ता, उमंग बजाज, अरविंदर सिंग लवली यांचा विजय झाला आहे. ह्या विजयाबद्दल आनंद व्यक्त करत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासाच्या राजकारणाला दिल्लीकरांनी ही दिलेली पावती आहे, अशी प्रतिक्रिया भाजपा नेत्यांनी दिली आहे.
मतदारसंघातून मुख्यमंत्री आणि आप नेत्या अतिशी मार्लेना विजयी झाल्या आहेत. मात्र, आम आदमी पार्टीचे सोमनाथ भारती आणि सत्येंद्र जैन हे दिग्गज नेते पराभूत झाले. आपचे नेते मनिष सिसोदीया यांनी पराभव स्वीकारत, पराजयाबद्दल विचारमंथन करणार असल्याचं म्हटलं आहे. आपचे अवध ओझा यांचाही पराभव झाला आहे. दिल्ली विधानसभेत दिग्गज नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल, माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यासह सत्यैंद्र जैन, सौरभ भारद्वाज यांना देखील पराभवाला सामोर जावं लागलं आहे. भाजपाचे रमेश बिधुडी, दुष्यंत गौतम यांचाही पराभव झाला आहे. काँग्रेस नेते संदीप दीक्षित आणि अलका लांबा यांचा देखील पराभव झाला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा