BREAKING NEWS
latest

'जे एम एफ' च्या दहावी माध्यमिक शालांत परीक्षांमध्ये जन गण मन इंग्रजी शाळा व विद्यामंदिर मधील विद्यार्थ्यांचे उज्वल यश संपादन..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली: शैक्षणिक ध्येयाला कलाटणी देणारा काळ म्हणजे दहावी. नुकत्याच जाहीर झालेल्या महाराष्ट्र व दिल्ली बोर्ड माध्यमिक परीक्षांचा निकालामध्ये जन गण मन इंग्रजी शाळा आणि विद्यामंदिर च्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करून शाळेचा झेंडा उंच फडकावला.
जन गण मन इंग्रजी माध्यमिक शाळा मधून निषाद रानडे या विद्यार्थ्याने ९६ टक्के मिळवून प्रथम क्रमांक मिळवला तर महिमा पांडे हिने ९४ टक्के व क्षितिज मुळीक याने ९१ टक्के मिळवून अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक मिळवला. जन गण मन विद्यामंदिर मधील मुग्धा शेटे या विद्यार्थिनीने ९१ टक्के मिळवून प्रथम क्रमांक पटकावला तर श्रुती कारिया हिने ८८ टक्के तर सौरभ दुबे याने ८७ टक्के मिळवून अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक पटकावला.
     
शाळेचे नावलौकिक उज्वल केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे 'जे एम एफ' संस्थेचे अध्यक्ष डॉ.राजकुमार कोल्हे आणि सचिव डॉ.प्रेरणा कोल्हे यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. पाठीवर पडलेली  कौतुकाची थाप ही तुमच्यासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे, आणि वेळीच चांगली अद्दल घडवण्यासाठी पाठीवर पडलेला हात तुमचे भवितव्य घडविणारा मार्ग आहे. यशाची व्याख्या म्हणजे स्वप्नपूर्ती तर अपयशाने खचून न जाता उभारी घेणे म्हणजे सुवर्ण संधी. असे सांगून संस्थापक डॉ. राजकुमार कोल्हे यांनी सर्वांना पुढील शैक्षणिक वाटचाली साठी भरभरून शुभेच्छा दिल्या.

शिशुविहार ते दहावी पर्यंत तुम्ही ह्या शाळेत शिक्षण घेतले, राग, लोभ, मित्रांबरोबर होणारी भांडणे पण लगेच राग निवळून सलोखा झालेले मित्र, शिक्षकांबरोबर झालेल्या प्रश्न उत्तराच्या स्पर्धा या आणि अशा प्रकारच्या अनेक  आठवणींच्या गोष्टींची शिदोरी घेऊन तुम्ही शाळेतून बाहेर पडताना मात्र मोठे यश मिळवून शाळेचे नाव उज्वल करून भविष्याच्या वाटेवर आपली वाटचाल करणार आहात याबद्दल तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन आणि शुभेच्छा असे सांगून सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे यांनी सर्वांचे कौतुक केले. शाळेच्या प्राचार्या, उप प्राचार्या आणि शिक्षकांनी स्वतः जातीने यशस्वी विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत