विशेष प्रतिनिधी
१० मे १८५७ च्या स्वातंत्र्य समरातील पराक्रमी वीरजवानांच्या अमर स्मृतींना वंदन करण्यासाठी जवान कृतज्ञता दिन साजरा करण्यात आला. या दिनाचे औचित्य साधत लोकमान्य सेवा संघ, पार्ले आयोजित "प्रणाम वीरा" कार्यक्रमात देशासाठी अतुलनीय सेवा बजावलेल्या वीरांना सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमात ऑपरेशन पवनमध्ये विशेष योगदान असलेले सेवानिवृत्त सार्जंट (ॲड.) दत्तात्रय अर्जुन उतेकर (भारतीय हवाई दल) आणि वीरमाता अनुराधाताई गोरे यांना कार्याध्यक्ष उदय तारदाळकर यांनी यथोचित सन्मान दिला. संघ कार्यवाह डॉ. रश्मी फडणवीस यांनी कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन केले.
दिशा कर्णबधिर विद्यालयाच्या कार्यवाह सुरक्षा घोसाळकर यांनी स्वातंत्र्य सैनिकांचा परिचय करून देण्याची जबाबदारी उत्कृष्टपणे पार पाडली. सेवानिवृत्त सार्जंट दत्तात्रय अर्जुन उतेकर यांनी परमवीर चक्र विजेत्या वीरांची थरारक शौर्यगाथा उलगडली, ज्यामुळे सभागृहातील वातावरण भारावून गेले.
वीरमाता अनुराधाताई गोरे यांनी नागरिकांच्या जबाबदारी संदर्भात मार्गदर्शन केले. यावेळी प्रतिभा सराफ आणि दिलासा सदस्यांनी विविध समरगीते सादर करत देशभक्तीचा जागर केला.
"त्याग आणि समर्पणाची भावना असलेल्या शूरवीरांना कृतज्ञतेच्या अश्रूंनी सलाम!" असा भावनिक संदेश देत कार्यक्रमाची यशस्वी सांगता झाली.
"भारतभूमीच्या वीरांना मानाचा मुजरा!"
हा कार्यक्रम केवळ एक सोहळा नव्हता, तर वीरांच्या त्यागाची आठवण जपणारा एक स्फूर्तिदायक क्षण होता. जय हिंद!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा