BREAKING NEWS
latest

'जे एम एफ' शिक्षण संस्थेमध्ये नवीन शैक्षणिक वर्षांत विद्यार्थ्यांच्या आगमनाने आनंदी आनंद गडे, सर्वत्र नादावले सनई चौघडे, व 'फादर्स डे' साजरा..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली - उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर येणारा जून महिना म्हणजे पावसाळ्याच्या सुखद सरींचा महिना. त्यातच शाळा सुरू होण्याचा शाळेचा पाहिला दिवस म्हणजे आनंदाची पर्वणीच होय. असाच आनंदाचा दिवस घेऊन शाळेच्या पहिल्या दिवशी हजर झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे 'जे एम एफ' शिक्षण संस्थेचे संस्थापक डॉ. राजकुमार कोल्हे, सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे, मुख्याध्यापक व इतर पदाधिकारी यांनी फुलांच्या वर्षावात व पायघड्या घालून सनई चौघडे लावून स्वागत केले. 'जन गण मन' इंग्रजी माध्यमिक शाळा व जन गण मन विद्यामंदिर शाळेतील शिशु विहार ते इयत्ता दहावी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांचे व 'वंदे मातरम' महाविद्यालयाचे  विद्यार्थी यांचे जल्लोषात स्वागत झाले.
कलात्मक शिक्षिका सपना येन्नम, दीपा तांबे, स्नेहा डोळे व नरेश पिसाट यांनी सुंदर रीत्या हस्तकलेने स्वागत कक्ष सजावट केला व इतर सर्व शिक्षकांनी सहकार्य केले. सर्व छोट्या मोठ्या वर्गातल्या मुलांचे आगमन होताच सर्व शिक्षकांनी टाळ्या वाजवून फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव करून मुलांचे स्वागत केले तर संस्थेच्या संस्थापिका सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे यांनी मुलांना ओवाळले. त्यावेळी मुख्याध्यापिका, उपमुख्याध्यापिका व सर्वांनी मिळून मुलांना हाताला धरून वर्गात प्रवेश केला.
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. राजकुमार कोल्हे यांनी देखील पुष्प वर्षाव करून सर्वांचे स्वागत केले. शाळा हे एक मंदिर आहे आणि हे सर्व विद्यार्थी म्हणजे या मंदिरातील देवता आहेत. विद्येची देवता सरस्वती, बुद्धीचा दाता गणपती बाप्पा अशा या देवतांचे रूप म्हणजे ही छोटी मुले असे उद्गार संस्थापक डॉ. राजकुमार कोल्हे यांनी काढले तर उन्हाळ्याच्या सुट्टीचा आनंद घेऊन आलेल्या सर्व मुलांनी असाच आनंद उत्साह वर्षभर टिकवून ठेवा असे सांगून १५ जून हा वाडीलांसाठी 'फादर्स डे', १२ मे हा आईसाठी 'मदर्स डे'  व १ जून पालकांसाठी 'पालक दिवस' असतो यांची आठवण करून सर्व मुलांनी आपल्या आई वडीलांसाठी ग्रीटिंग कार्ड्स बनविले व 'जे एम एफ' संस्थेने सर्वांना चॉकलेट दिले तर त्यांच्या  घरात जेवढे काही सदस्य आहेत तेवढे चॉकलेट्स विद्यार्थ्यांना दिले. अशा प्रकारे नवीन आगमनासोबत पालक दिवस पण साजरा करण्यात आला. 
मुलांच्या चेहऱ्यावरचा ओसंडून वाहणारा आनंद बघून संस्थापिका सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे यांनी देखील मुलांना जवळ घेऊन आलिंगन देऊन त्यांचे स्वागत केले, तुम्हा सर्व मुलांचे आनंदी चेहरे बघून बालपण हे कधी संपूच नये असे वाटते आणि शिक्षण घेऊन मोठे होऊन असेच बाल मनाने आनंदाने जगा असे उद्गार डॉ. प्रेरणा कोल्हे यांनी काढले. जन गण मन इंग्लिश शाळा आणि विद्यामंदिर माध्यमातील सर्व शिक्षक वर्गाने मुलांचे स्वागत करून शाळेच्या अध्यापनास सुरुवात केली.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत