मुंबई - मुंबईत ३० जून २०२५ पर्यंत हाय सिक्युरिटी नंबर प्लेट (HSRP) लावण्याची अंतिम मुदत आहे. २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या वाहनांना ही नंबर प्लेट लावणे राज्य परिवहन विभागाने बंधनकारक केले असून तुम्ही अजूनही हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावली नसेल तर तुमच्यासाठी ही शेवटची संधी आहे. पुन्हा हाय सिक्युरिटी नंबरप्लेटसाठी मुदतवाढ होणार नाही. त्यामुळे अजूनही तुम्ही जर हाय सिक्युरिटी नंबरप्लेट लावली नसेल तर लगेच करून घ्या. राज्य परिवहन विभागाने उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट (HSRP) लावण्याची अंतिम मुदत ३० जून २०२५ आहे. ज्या वाहनांची नोंदणी १ एप्रिल २०१९ पूर्वी झाली आहे, अशा मालकांना आता ३० जून २०२५ पर्यंत HSRP लावण्याची संधी मिळणार आहे. यापूर्वी ३१ मार्च २०२४ पर्यंत होती, जी नंतर ३० एप्रिल २०२४ पर्यंत वाढवण्यात आली होती. HSRP लावण्याच्या प्रक्रियेची गती मंद असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. हा नियम विशेषतः २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या जुन्या वाहनांसाठी असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. HSRP नंबर प्लेट नसेल तर ३० जून २०२५ नंतर दंड आकारला जाणार आहे. फॅन्सी नंबर प्लेट पूर्णपणे बेकायदेशीर ठरतील, कारण काही डिझाईन वाचायला कठीण असतात. अंतिम मुदत संपल्यानंतर, अनधिकृत नंबर प्लेट वापरल्यास मोटार वाहन अधिनियम, १९८८ च्या कलम १७८ अंतर्गत १००० रुपयांचा दंड आकारला जाईल.
काय आहे हाय-सिक्युरिटी नंबर प्लेट ?
HSRP एक विशेष सुरक्षा वैशिष्ट्ये असलेली नंबर प्लेट आहे. यात १० अंकी युनिक लेझर-ब्रांडेड आयडी नंबर आणि लेझरने कोरलेला कोड असतो. यामुळे ही प्लेट छेडछाड करणे शक्य नसते. ही प्लेट दुर्मिळ ॲल्युमिनियम धातूपासून बनलेली असते आणि त्यावर 'IND' बॅजिंग असते, ज्यावर अशोकचक्राचे होलोग्राम हॉट-स्टॅम्प केलेले असते. याव्यतिरिक्त, प्लेटवर रिफ्लेक्टिव्ह फिल्म असते, ज्यावर "INDIA" असे नमूद केलेलं असतं.
HSRP कोठून लावावी ?
नवीन गाड्यांमध्ये HSRP पूर्वीपासूनच लावलेली असते. पण २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या वाहनांना ही प्लेट वेगळी लावावी लागेल. महाराष्ट्रातील वाहन मालकांना HSRP फक्त अधिकृत विक्रेत्यांकडूनच लावावी लागेल, जे परिवहन विभागाकडे नोंदणीकृत आहेत. अधिकृत विक्रेत्यांची यादी VAHAN पोर्टलवर उपलब्ध आहे. या पोर्टलवरून माहिती घेऊन वाहन मालक आपल्या गाडीसाठी HSRP बुक करू शकतात. त्यामुळे ज्यांच्या गाड्यांना अजून HSRP लागलेली नाही, त्यांनी आता दिलेली मुदत लक्षात घेऊन त्वरित HSRP लावून घ्यावी, जेणेकरून त्यांना दंड टाळता येईल.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा