कल्याण - सोनसाखळी लंपास करणाऱ्या एका चोरट्यास कोळसेवाडी पोलीसांनी अटक केली आहे. प्रितम जाधव असे त्याचे नाव असून, त्याच्याकडून कोलशेवाडी पोलीसांनी ८ ग्रॅम वजनाची सोन्याची चेन हस्तगत केली आहे.
याबाबत वृत्त असे आहे कि, कोळसेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गणेशवाडी येथील सरस्वती विद्यामंदिर शाळेजवळ फिर्यादीच्या गळ्यातील सोन्याची चेन एका इसमाने खेचून तो कल्याण रेल्वे ट्रॅक च्या दिशेने पळून गेला असल्याबाबत कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याअनुषंगाने पोलीसांनी तपास करून मिळालेल्या माहितीच्या आधारे प्रितम जाधवला अटक केली. आणि त्याच्याकडून गुन्ह्यातील सोन्याची चेन हस्तगत केली.
सदरची यशस्वी कारवाई पोलीस उप आयुक्त, परीमंडळ ३, कल्याण अतुल झेंडे, सहा. पोलीस आयुक्त कल्याण विभाग कल्याणजी घेटे यांच्या मार्गदर्शनाखाली कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणेश न्हायदे, पो. निरी प्रशासन खबाजी नाईक यांच्या सुचनेप्रमाणे सपोनि. संदिप भालेराव, पोहवा. वाघ, जाधव, कदम, पोशि. सोनवणे, इंगळे यांनी केली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा