डोंबिवली : मुंबई विद्यापीठामध्ये नुकत्याच पार पडलेल्या 'एकांकिका नाटक स्पर्धा' व 'मूक अभिनय' स्पर्धेमध्ये 'जे एम एफ' शिक्षण संस्था संचालित 'वंदे मातरम्' पदवी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी अनुक्रमे रौप्य पदक व सुवर्ण पदक पटकावून महाविद्यालयाचे नाव उज्वल केले. दिवेश मोहिते, पराग सुतार, तन्वी गुरव, मंथन पाटील, मितेश पाटील, निधी अमीन त्याच बरोबर सहकारी सिद्धार्थ कटारे, स्नेहा मिश्रा यांनी मूक अभिनय स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक जिंकून प्रथम स्थान निश्चित केले व पुन्हा एकदा 'वंदे मातरम्' पदवी महाविद्यालयाच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा खोचला. नाटकाचे दिग्दर्शन शुभम जाधव यांनी केले सांस्कृतिक समन्वयक मयांक कोठारी यांनी प्रतिनिधित्व केले. मिस मृणाली जाधव यांनी या सर्वांचे नेतृत्व केले
यशाची पायरी चढताना अपयशाच्या पायऱ्यांनाही तेवढेच महत्व असते, म्हणूनच अपयश ही यशाची पहिली पायरी आहे असे म्हटले जाते. नाटक आणि अभिनय स्पर्धेमध्ये अनुक्रमे रौप्य आणि सुवर्ण पदक मिळवून तुम्ही वंदे मातरम् महाविद्यालयाला सन्मानित केले आहे त्याला तोड नाही, भविष्यात देखील अशीच अनेक यशाची उत्तुंग शिखरे चढत रहा आणि आपल्या महाविद्यालयाचे नाव उज्वल करा असे संस्थापक अध्यक्ष डॉ. राजकुमार कोल्हे यांनी विद्यार्थांना सांगून अभिनंदन करून शुभेछा दिल्या.
दर सेकंदाला माणसाच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलत असतात म्हणजेच रोजच्या वास्तविक जीवनात देखील मनुष्य नकळतपणे मूक अभिनय करतच असतो, नामांकित स्पर्धेमध्ये औपचारिक रित्या सहभागी होऊन मूक अभिनय करून प्रेक्षकांकडून जी तुम्ही दाद मिळवली व सुवर्ण पदक पटकावले त्याबद्दल सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन असे म्हणून सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे देखील मुलांच्या आनंदात सहभागी झाल्या. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नाडर, उप प्राचार्या सौ. वनिता लोखंडे, मुख्य समन्वयक सौ. मंजुळा धावले तसेच सर्व 'जे एम एफ' परिवार यांनी पदक विजेते विध्यार्थ्यांचे कोटी कोटी अभिनंदन केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा