मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने प्रवाशांच्या सोयीसाठी आणि ई-बस सेवेला अधिक प्रतिसाद मिळवण्यासाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आता राज्यातील ई-बस प्रवाशांना मासिक व त्रैमासिक पास सवलत योजना उपलब्ध होणार आहे. उच्च सेवा वर्गाचा पास असलेले प्रवासी निमआराम किंवा साध्या बसमधून प्रवास करु शकतील. मात्र निमआराम किंवा साध्या बसचा पासधारक ई-बसने प्रवास करत असल्यास दोन्ही सेवांतील भाड्याचा फरक १०० टक्के दराने भरावा लागणार आहे.
काय आहे योजना ?
या योजनेंतर्गंत प्रवाशांना ६० दिवसांचे भाडे भरून ९० दिवस प्रवास करण्याची मुभा मिळणार आहे.
कोणत्या बससाठी पास उपलब्धः ९ मीटर ई-बस, १२ मीटर ई बस आणि ई शिवाई सेवा (ई-शिवनेरीवगळून)
मासिक पास (३० दिवस): २० दिवसांच्या परतीच्या प्रवासाचे भाडे आकारुन ३० दिवस वैध
त्रैमासिक पास (९० दिवस): ६० दिवसांच्या परतीच्या प्रवासाचे भाडे आकारुन ९० दिवस वैध
एसटी महामंडळाने घेतलेल्या पास योजनांचा मुख्य उद्देश नोकरी व व्यवसायाच्या निमित्ताने दररोज एकाच मार्गावर प्रवास करणाऱ्या नियमित प्रवाशांना ई-बस सेवेकडे आकर्षित करणे हा आहे, अशी माहिती एसटी महामंडळाचे अध्यक्ष आणि आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. सध्या महामंडळाच्या ताफ्यात ई-बस प्रकल्पातील ४४८ बसेस आणि शिवाई प्रकल्पातील ५० ई-बसेस कार्यरत आहेत. या बसेसची संख्या टप्प्याटप्प्याने वाढवण्याचा मानस असल्याचे सरनाईक म्हणाले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा