दिवा, दि. २ नोव्हेंबर : भारतीय जनता पार्टी दिवा- शीळ मंडळाच्या वतीने आयोजित ‘जय जय रवळनाथ’ या चालचित्रयुक्त नाट्यप्रयोगाचा भव्य कार्यक्रम शनिवारी मोठ्या उत्साहात पार पडला. यासाठी दिव्यातील चाकरमान्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढविली.
हा चलचित्रीत दशावतार नाट्यप्रयोग दशावतार नाट्य मंडळ नेरुर कुडाळ या मंडळाने तर मंडळाचे संचालन सिध्देश सुधीर कलिंगण यांनी केले. या वर्षीच्या दिग्गज नावलौकीक उत्कृष्ट कलाकारांच्या दमदार संचासहित, महान पौराणिक भव्यदिव्य, संघर्षमय, चलचित्रीत नाट्य कलाकृती काल चाकरमान्यांसमोर सादर झाली. तसेच कार्यक्रमाचे समालोचन विवेक पोरजी आणि करुना ढेगे यांनी सादर केले. कार्यक्रमाआधी थोडासा पाऊस पडला असला तरी चाकरमान्यांच्या उत्साहात किंचितही फरक पडला नाही. एक वर्षांच्या बाळापासून ते ८० वर्षांच्या आजोबांपर्यंत सर्व वयोगटातील दिव्यातील नागरिकांनी उपस्थित राहून ‘जय जय रवळनाथ’ दशावतारी नाट्यप्रयोगाचा आनंद घेतला.
महालक्ष्मी अंबाबाईचे दर्शन, चित्रविचित्र किड्यावर मांत्रिक ध्यानस्त, चलचित्रीत मंदिराचा देखावा, बुरुजातून दिव्य शक्ती प्रगट, रुद्र तेजोमय त्रिशूळ रवळनाथाच्या हाती येणे, घोड्यावर बसून रवळनाथाचे आगमन, अचाट शक्तीची निमिर्ती, ज्योतीबा दर्शन आणि महाकाय रेडा संग्राम, त्रिशूळ तेजोमय होणे, त्रिसूळातून अधांतरी चितविचित्र पिशाच्छ निमिर्ती, त्रिशूळाच्या सहाय्याने रेड्याचे शीर मारणे, त्रिशूळाने मांत्रिकाचा संहार होणे हे सर्व नाट्य प्रयोग हलत्या चलचित्रातून चाकरमान्यांनी पाहिले. दिव्याच्या संस्कृतीत भर घालणारा हा नाट्यप्रयोग सर्वांच्या मनात घर करून गेला.
त्यावेळी कल्याण पूर्वच्या आमदार सुलभा गायकवाड, ठाणे जिल्हा अध्यक्ष संदीप लेले, कल्याण जिल्हा अध्यक्ष नंदु परब, माजी जिल्हा अध्यक्ष संजय वाघुळे, ठाणे जिल्हा सरचिटणीस विक्रम भोईर, विजय भोईर, अशोक पाटिल, गणेश भगत, दिलीप भोईर, अंकुश मढवी, रोशन भगत, रेश्मा पवार, सीमा भगत, महिला मोर्चा अध्यक्षा सपना भगत, चेतन पाटिल, समीर चव्हाण, सतीश केळशीकर, साहिल पाटिल, अशोक गुप्ता, गौरीशंकर पटवा, अवधराज राजभर, जिलाजीत तिवारी, पूनम सिंग, रीना सिंग, नीलम मिश्रा आदी भाजप कार्यकर्ते उपस्थित होते. या दशावतारी नाट्य प्रयोगासाठी विशेष मेहनत नितिश कोरगांवकर, रवी मुननकर, विठ्ठल गावडे, किरण कोरगांवकर, अनंत पडेलकर, स्वप्नील धुमाळ आणि अनिल गावकर यांनी घेतली होती.
कलाकार सिध्देश कलिंगण, काका कलिंगण, निळकंठ सावंत, रोहित नाईक, राधाकृष्ण नाईक, सुनील खोरजूवेकर, पप्पू घाडीगावकर, संजय लाड, परशुराम मोरजकर, तर लोकराजा ट्रीकसीन ग्रुप नेरुर कौस्तुभ कलिंगण, प्रतिक कलिंगण, संजय नेवगी, तुषार परब, रोहित नारकर, श्रीकृष्ण सावंत, प्रथमेश परब, सिध्देश तारवे, कुणाल पेंडुरकर, मयूर माने, मनीष नेरुरकर, तर संगित साथ हार्मोनिअम आशिष तवटे, मृदुंगमणी चंद्रकांत खोत, तालरक्षक राजू कलिंगण यांनी संगतील दिले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा