डोंबिवली - शालेय विद्यार्थ्यांच्या बाबतीत शिक्षकांचे सकारात्मक विचार आणि शिस्त हा महत्वाचा घटक आहे, या संदर्भात जिल्ह्यामध्ये मनपा, तालुका व केंद्रस्तरावर सकारात्मक शिस्त या विषयावर विशेष शिक्षण परिषदेचे आयोजन 'जे एम एफ' मधुबन वातानुकूलित दालनात करण्यात आले होते, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व या चर्चासत्राचे वक्ते डॉ.राजकुमार कोल्हे यांनी सकारात्मक शिस्ती बाबतचे व्याख्यान दिले. आयोजित केलेल्या व्याखनाला 'सी आर सी' प्रमुख क्रमांक २१ च्या सौ.राजश्री जतकर, कल्याण डोंबिवली महानगर पालिका, कल्याण येथील प्रशासन अधिकारी श्री.भारत बोरनारे तसेच जिल्ह्यातील सर्व शिक्षक मुख्याध्यापक यांची उपस्थिती प्रार्थनीय होती.
संस्थापक अध्यक्ष डॉ. राजकुमार कोल्हे आणि संस्थापिका सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व स्वागत करून व्याख्यानमाला सुरू करण्यात आली. वक्ते डॉ. राजकुमार कोल्हे यांनी विद्यार्थ्यांच्या बाबतीत शिक्षक कसा असावा तर शिक्षक हा संयमी, सकारात्मक विचारांचा, वेळ प्रसंगी कठोर पण मृदु देखील असावा असे सांगितले. मस्ती करणे हा विद्यार्थ्यांचा स्वाभाविक गुण आहे, अनेक विद्यार्थ्यांना अध्यापन हा कंटाळवाणा विषय वाटत असतो, शिक्षक शिकवत असताना एकमेकांच्या खोड्या काढणे, आपापसात कुजबूज करणे, अशा प्रकारच्या मस्ती करत रहाणे या गोष्टी विद्यार्थी दशेत घडणे हे स्वाभाविक आहे, त्यासाठी विद्यार्थ्यांना शिक्षा ही दिली जाते परंतु दिलेल्या शिक्षाचा वाईट परिणाम मुलांवर होऊन मुले वैचारिक रित्या कठोर होऊ लागतात, म्हणून शिक्षकांनी मुलांना शिक्षा न करता सकारात्मक विचाराने आणि संयमाने सद्य परिस्थिती हाताळणे आणि विद्यार्थ्यांना सकारात्मक शिस्त लावणे हे योग्य ठरेल असे डॉ. राजकुमार कोल्हे यांनी आपल्या व्याख्यानात सांगितले. जेव्हा मूल वाचन, संभाषण, आणि अभ्यास अशी बौद्धिक कामे करत असतो, अशा वेळेला त्याला रागावले तर त्याला भीती वाटते. मग बुद्धीचे काम थांबवून भावनांचे काम सुरू होते, आणि अशा वेळी जर अजून मोठी शिक्षा झाली तर विद्यार्थी स्वतःचा आत्मविश्वास गमावून बसतो यासाठी संवाद, सहकार्य व समुपदेशन करण्याचे कार्य आणि कर्तव्य हे शिक्षकाचे आहे म्हणूनच विद्यार्थ्यांना शिक्षा न करता त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी विद्यार्थी दशेत अनेक वेळा अपयशी ठरलेले परंतु भविष्यात यशस्वी ठरलेल्या व्यक्तींची उदाहरणे विद्यार्थांना द्यावीत, फेसबुक , व्हॉट्सऍप, अशा अनेक
संगणकीय उपयोजन विकसित केलेले तद्न्य हे विद्यार्थी दशेत असताना यशस्वी नव्हते ते देखील आजच्या विद्यार्थ्यांसारखेच होते परंतु शिक्षकांच्या सकारात्मक शिस्तीने त्यांच्या मधे बदल घडवून आला आणि ते यशस्वी झाले, म्हणून ध्येय गाठायचा आधी तिथं पर्यंत पोहचण्याचा प्रवासाची तयारी आधी करा असा मोलाचा सल्ला डॉ.राजकुमार कोल्हे यांनी उपस्थित सर्व शिक्षक मुख्याध्यापक यांना दिला.
अनेक यशस्वी अयशस्वी मोठ्या व्यक्तींची चित्रफित दाखवून यशाची आणि सकारात्मक शिस्ती ची व्याख्या डॉ. राजकुमार कोल्हे यांनी सांगितली. या चर्चासत्रात अनेकांनी आपल्या मनातले प्रश्न डॉ. राजकुमार कोल्हे यांना विचारले व समाधान कारक उत्तरे मिळवली. सुमारे २५० ते ३०० शिक्षक या परिसंवादामध्ये सहभागी झाले होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा